IPL 2025, RCB vs PBKS : आयपीएलच्या नीच्चांकी धावसंख्येत बंगळुरूची ९ बाद ९५ धावसंख्या कुठे बसते?

IPL 2025, RCB vs PBKS : बंगळुरूचा पंजाबने ५ गडी राखून पराभव केला.

90
IPL 2025, RCB vs PBKS : आयपीएलच्या नीच्चांकी धावसंख्येत बंगळुरूची ९ बाद ९५ धावसंख्या कुठे बसते?
  • ऋजुता लुकतुके

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघासाठी पंजाब विरुद्धच्या सामन्यात पहिल्या षटकापासूनच फलंदाज माघारी परतण्याची मालिका सुरू झाली. एरवी या हंगामातील फील सॉल्ट आणि विराट कोहली ही सगळ्यात यशस्वी सलामीच्या जोड्यांपैकी एक आहे. पण, यावेळी पहिल्याच षटकांत सॉल्ट चार धावा करून बाद झाला. त्यानंतर विराटने खेळाची सूत्रं आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला. पण, तो ही तिसऱ्याच षटकांत एका धावेवर बाद झाला. तिथून फलंदाज तंबूत परतण्याची स्पर्धाच सुरू झाली. १२ व्या षटकांत त्यांची अवस्था ९ बाद ६३ झाली होती. पण, टीम डेव्हिडने २६ चेंडूंत नाबाद ५० धावा करत बंगळुरूला किमान शतकी धावसंख्येच्या जवळ नेलं. एरवी फलंदाजांना मदत करणाऱ्या चिन्नास्वामी मैदानावर फलंदाजीचं पानिपत झालं. (IPL 2025, RCB vs PBKS)

पंजाबकडून अर्शदीप, मार्को यानसेन, यजुवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. डेव्हिडने नाबाद ५० धावा करत बंगळुरूला मानहानीपासूनही वाचवलं आहे. बंगळुरूची ही धावसंख्या आयपीएलच्या इतिहासातील ३८ वी सगळ्यात नीच्चांकी धावसंख्या आहे. पण, संघाची सलग झालेली पडझड मात्र अभूतपूर्व होती. फक्त टीम डेव्हिड आणि रजत पाटिदार यांनी दुहेरी आकडा गाठला. बाकी सगळे फलंदाज एकेरी धावसंख्येतच बाद झाले. विशेष म्हणजे बंगळुरूने यावेळी नीच्चांकी धावसंख्या गाठणं टाळलं असलं तरी आयपीएलमधील हा नकोसा विक्रम त्यांच्याच नावावर आहे. (IPL 2025, RCB vs PBKS)

(हेही वाचा – Memory of the World Register : श्रीमद् भगवद्गीता, भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा गौरव ! युनेस्कोने घेतली दखल)

आयपीएलमधील नीच्चांकी ५ धावसंख्या पाहूया : 

सर्वबाद ४९ – बंगळुरू वि. कोलकाता (२०१७)

सर्वबाद ५८ – राजस्थान वि. बंगळुरू (२००९)

सर्वबाद ५९ – राजस्थान वि. बंगळुरू (२०२३)

सर्वबाद ६६ – दिल्ली वि. मुंबई (२०१७)

सर्वबाद ६७ – दिल्ली वि. पंजाब (२०१७)

पंजाबच्या गोलंदाजांनी अचूक आणि शिस्तबद्ध गोलंदाजी केली. तसंच क्षेत्ररक्षकांनी झेलही टिपले. त्यांच्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीला उत्तर देणं बंगळुरूच्या फलंदाजांना जमलं नाही. (IPL 2025, RCB vs PBKS)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.