Congress : नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात (National Herald case) सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने (Congress) खडकी रेल्वे स्टेशनवर लोणावळा-पुणे लोकल ट्रेन अडवून आपला रोष व्यक्त केला आहे. एकीकडे काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे भाजपा (BJP) समर्थकही आक्रमक झाले आहेत. काँग्रेस भवन (Congress Bhawan) बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिरापासूनच पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. काँग्रेस भवनावर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. त्यामुळे, पुण्यात नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरुन जोरदार राडा पाहायला मिळत आहे. काँग्रेसने २००० कोटी रुपयांचा घोटाळा केला असून आता फेक नेरेटीव्ह पसरवण्यात येत आहे. त्यामुळे, सोनिया गांधी व राहुल गांधी यांना अटक करावी, अशी आमची मागणी असल्याचं भाजपा समर्थकांचं म्हणणं आहे.
(हेही वाचा – बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले credit card; बँकेलाच एक कोटी २६ लाखांना फसवले)
पुण्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनची (Congress Bhavan Pune) वाट धरल्याने काँग्रेस आणि भाजपा समर्थक आमने-सामने आले आहेत. पुण्यातील (Pune) बालगंधर्व चौकात १८ एप्रिलला हा राडा सुरू असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काँग्रेस भवनमध्ये आम्ही जाणारच, राहुल गांधी-सोनिया गांधी यांना अटक करा. अशी भूमिका भाजपा समर्थकांनी घेतली. तर, काँग्रेस समर्थकही काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले. (Congress)
(हेही वाचा – Naxalite Surrender : छत्तीसगडच्या सुकमामध्ये 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community