MPSC : राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलन्यात आल्या आहेत. पुण्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांचं हे सर्वात मोठं यश मानलं जात आहे. येत्या २६ ते २८ एप्रिल दरम्यान मुख्य परीक्षा घेतल्या जाणार होत्या. त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या सुधारित माहितीनुसार, आता २६, २७ आणि २८ मे रोजी मुख्य परीक्षा घेतल्या जाणार आहेत. (MPSC)
दरम्यान जारी केलेल्या शुद्धिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ (Gazetted Combined Preliminary Examination-2024) मधील राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२४ करीता दिनांक १२ मार्च, २०२५ रोजी निकाल प्रसिद्ध करण्यात आला होता. प्रस्तुत पूर्व परीक्षेच्या (Exam) निकालातून पात्र ठरलेल्या काही EWS अथवा OPEN मधून SEBC अथवा OBC विकल्प निवडलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेचा अर्ज करताना त्यांच्या अर्जामध्ये सुधारित विकल्प दिसून न आल्याने यासंदर्भात उमेदवारांकडून निवेदने प्राप्त झाली होती.
(हेही वाचा – Sanatan Sanstha : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन !)
आरक्षणाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या असाधारण परिस्थितीचा विचार करून परीक्षेच्या वेळापत्रकातील प्रस्तुत बदल हा एकवेळची अपवादात्मक बाब म्हणून आयोगाकडून सदर निर्णय घेण्यात आला आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community