गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यात काही दिवसांपूर्वी केस गळती प्रकरण सुरू झाले होते. यानंतर आता केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे. (Buldhana News)
याबाबत बुलढाणा आरोग्य अधिकारी (वर्ग एक) डॉ. अनिल बनकर यांनी म्हटलं आहे की, “एकूण चार गावांमध्ये नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्णांमध्ये नखांची गळती होत आहे. चार गावांमध्ये सध्या एकूण 29 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे सांगण्यात आले आहे. सेलेनियमचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज आहे. जे केस गळतीचे रुग्ण आहेत, त्यांच्यामध्ये सध्या नखं गळतीची समस्या जाणवत आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले. (Buldhana News)
बुलडाण्यातल्या शेगाव तालुक्यातील काही गावांमध्ये पाण्यामुळे अनेकांचे टक्कल पडले. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच टक्कल पडल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे. बुलडाण्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल समोर आला होता. हे पाणी वापरणे किंवा पिण्यायोग्य नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी दिली होती. बोंडगाव आणि खातखेडमध्ये ७० पेक्षा अधिक नागरिकांचे केस जाऊन टक्कल पडले. पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे. साधारणता पाण्यात नायट्रेटचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत असायला पाहिजे. पण याठिकाणच्या पाण्याच्या तपासणी अहवालातून ५४ टक्के नायट्रेटचे प्रमाण असल्याचे समोर आले होते. (Buldhana News)
आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आल आहे. (Buldhana News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community