-
प्रतिनिधी
दापोली मतदारसंघात राज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी १५० कोटींपेक्षा अधिक निधी मंजूर करून सर्वांगीण विकासाला गती दिली आहे. या निधीतून प्रशासनिक सुविधा, पर्यटन, पाटबंधारे आणि तांडा वस्ती सुधार योजनांसाठी भरीव कामे हाती घेण्यात आली आहेत.
(हेही वाचा – CC Road : रस्ते काँक्रिटीकरण कामात हलगर्जीपणा; कंत्राटदाराविरोधात मोठी कारवाई)
दापोलीत उपविभागीय अधिकारी आणि तहसील कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी ३०.४७ कोटी, तर मंडणगड येथील तहसील कार्यालयासाठी २३.२० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी कोकण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत दापोलीतील करदे समुद्रकिनाऱ्याच्या सौंदर्यीकरणासाठी १४.२० कोटी मंजूर झाले आहेत. तसेच, मंडणगड येथील बाणकोट किल्ल्यापर्यंत ६०.५ किमी लांबीचा रोपवे प्रस्तावित असून, दापोलीतील केशवराज विष्णू मंदिर परिसरातील १.२ किमी लांबीचा रोपवे अंतिम टप्प्यात आहे. गोवा किल्ला, भुईकोट किल्ला आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या (हर्णे, दापोली) विकासामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल.
(हेही वाचा – Ayushman Bharat Yojana : ४० हजार उत्तर मुंबईकरांनी घेतला ‘आयुष्मान भारत योजने’चा लाभ)
जलसिंचनासाठी मंडणगडातील पणदेरी धरण लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ६०.४१ कोटी मंजूर झाले आहेत. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतंर्गत सहा तांड्यांसाठी १ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या वस्तींच्या विकासाला हातभार लावला आहे. या सर्व प्रकल्पांमुळे दापोली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्या नेतृत्वाखाली दापोलीत २ हजार कोटींची विकासकामे झाल्याचा दावा आहे, ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ मिळाले आहे. ही कामे दापोलीच्या प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरतील, अशी अपेक्षा आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community