Ashadhi Wari 2025 : महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरा असणाऱ्या आषाढी यात्रेची तयारी आता सुरू झाली आहे. आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराज (Saint Dnyaneshwar Maharaj palkhi Route 2025) आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थानाच्या तारखा ठरल्या. आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 19 जून रोजी प्रसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचे (Sant Tukaram Maharaj Palkhi Route 2025) प्रस्थान 18 जून रोजी देहू आणि आळंदी येथून पंढरपूरला होणार आहे. (Ashadhi Wari 2025 )
संत ज्ञानेश्वर महाराजांचा पायी वारी पालखी (Ashadhi Payi Wari 2025) सोहळा १९ जुन रोजी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. ५ जुलै रोजी माऊलींची पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. पंढरपूर येथे पार पडलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज बैठकीत वारीतील (Wari 2025) विसावा, मुक्काम व इतर नियोजनावर सांगोपांग चर्चा करण्यात आली. अद्याप अधिकृत वेळापत्रक ठरले नसून लवकरच संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात येईल असे देवस्थान तर्फे सांगण्यात आले आहे.
(हेही वाचा – Conversion : ‘ख्रिस्ती व्हा, गरिबी दूर होईल’; बिलासपूरमधील धर्मांतराचा डाव हिंदू संघटनांनी उधळला, पाद्रीसह ६ जणांना अटक)
दरम्यान यंदा पालखी सोहळा वेळापत्रक तिथीक्षय होत असल्याने लोणंद येथे अडीच दिवस मुक्काम घ्यावा अशी चर्चा दिंडी सामाजिक बैठकीत झाली. मात्र, यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.यावेळी आळंदी देवस्थानचे (Alandi Temple) प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ऍड.राजेंद्र उमाप, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, रामभाऊ चोपदार, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, नामदेव वासकर, विठ्ठल वासकर, मारुती कोकाटे, भाऊ महाराज फुरसुंगीकर, चैतन्य महाराज कबीर, आबा धाडगे, एकनाथ हांडे आदी उपस्थित होते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community