अभियांत्रिकी विषयाच्या परीक्षा आता मराठीतून; CM Devendra Fadnavis यांची विधान परिषदेत माहिती

138
पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतून खोदून काढू!; नागपूर दंगल प्रकरणात CM Devendra Fadnavis यांचा इशारा
  • प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या अभियांत्रिकीसारख्या तांत्रिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा आता मराठीतूनही घेतल्या जाणार आहेत. यासाठी मराठीतून पुस्तके तयार करण्यासाठी आयोगाशी चर्चा करून कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधान परिषदेत दिली.

आमदार मिलिंद नार्वेकर यांनी उपस्थित केला प्रश्न

विधान परिषदेत आमदार मिलिंद नार्वेकर यांनी MPSC च्या स्पर्धा परीक्षांबाबत प्रश्न उपस्थित केला. महाभारतीच्या वेबसाइटवर ‘जनरल ॲग्रीकल्चर’ आणि ‘ॲग्रीकल्चर सायन्स’ या दोन परीक्षांची माहिती केवळ इंग्रजीतच देण्यात आल्याचे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणले.

मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) उत्तर देताना स्पष्ट केले की, “MPSC च्या स्पर्धा परीक्षा सध्या मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये घेतल्या जातात. मात्र, काही तांत्रिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा केवळ इंग्रजीत घेतल्या जात होत्या.”

(हेही वाचा – Jammu Kashmir च्या नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर सीमेपलीकडून गोळीबार; एक लष्करी जवान जखमी)

न्यायालयाच्या निर्देशानंतर सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “हा विषय न्यायालयात गेला असता, त्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान आयोगाकडे मराठीत आवश्यक अभ्याससामग्री उपलब्ध नाही, हे समोर आले. न्यायालयाला हे स्पष्ट केल्यानंतर मराठीतून परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात आली.”

नव्या शैक्षणिक धोरणानुसार अभियांत्रिकी विषय मराठीत शिकवण्याची मुभा मिळाल्याने, ज्या विषयांची पुस्तके मराठीत उपलब्ध नाहीत, त्यांची निर्मिती करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.

(हेही वाचा – आता दुर्गम भागातही रोबोटिक शस्त्रक्रिया होणार: Tele-Robotic Surgery घराजवळ सुविधा देणार)

मराठीतून परीक्षा घेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

MPSC आणि सरकारच्या पुढाकाराने मराठीतील पाठ्यपुस्तके तयार करण्यासाठी एक नियोजित कार्यक्रम आखण्यात येणार आहे. यानंतर अभियांत्रिकी आणि इतर तांत्रिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा मराठीतून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

हा निर्णय मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी ठरणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.