मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; BEST Bus मधील अशुद्ध मराठी सूचनांमुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप!

नवीन गाड्यांवर सुधारित सूचना लावण्याचे बेस्ट प्रशासनाचे सुराज्य अभियानाला आश्वासन!

370
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; BEST Bus मधील अशुद्ध मराठी सूचनांमुळे मराठी भाषाप्रेमींमध्ये संताप!

एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील बेस्ट बसगाड्यांमधील (BEST Bus) सूचना फलकांमध्ये ‘पोलिसानां’, ‘न्यावि’, ‘प्रवाश्यांनी’ आदी भयंकर अशुद्ध मराठी शब्द पाहून मराठीभाषा प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एकीकडे वातानुकूलित, इलेक्ट्रिक अशाप्रकारे बेस्ट बसचा दर्जा सुधारत असतांना मराठी भाषेचा दर्जा का घसरत आहे? महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी भाषेची होणारी दुरावस्था तात्काळ दूर करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने प्रवाशांसाठी बसगाड्यांमध्ये लावलेल्या मराठीतील सूचनांचा दर्जा सुधारावा आणि त्या शुद्ध प्रमाणित मराठीत असाव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या वतीने बेस्ट प्रशासन, मराठी भाषामंत्री आणि मुंबई महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. (BEST Bus)

(हेही वाचा – Donald Trump यांनी युक्रेनला युद्धात दिलेली सर्व लष्करी मदत थांबवली)

यावर ‘बेस्ट’चे सहाय्यक महाव्यवस्थापक श्रीनिवास राव यांनी सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले आहे की, तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत. याविषयी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊ. सध्या बेस्टकडे (BEST Bus) ५०० नवीन गाड्या आहेत, तसेच नव्याने २ हजार ५०० नवीन गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. या सर्व गाड्यांवर सुधारित सूचना लावण्यात येतील. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता राहुल पाटकर, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड, अधिवक्ता सुरभी सावंत, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक सुभाष अहिर, निखिल दाते, सुराज्य अभियानाचे प्रसाद मानकर आणि बेस्टचे जनसंपर्क प्रमुख सुदास सावंत हेही उपस्थित होते. (BEST Bus)

(हेही वाचा – Dhananjay Mundhe Resigns: त्यांनी मंत्रीपदाची शपथच घ्यायला नको होती; पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया)

सुराज्य अभियानाच्या कार्यकर्त्यांनी बेस्टच्या बसगाड्यांमधील काही सूचना अशुद्ध असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने सूचना आणि परिपत्रके जारी करताना त्यांची शुद्धता तपासण्यासाठी ‘मुद्रितशोधक’ पद निर्माण करावे, भविष्यात सूचना आणि परिपत्रकांचे अंतिम प्रमाणन मुद्रितशोधकांकडून करून घेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच बेस्ट प्रशासनातील कर्मचाऱ्यांना शुद्ध मराठी लेखनाचे प्रशिक्षण देण्याचा मुद्दाही चर्चेत आला. मराठी भाषेच्या शुद्धतेसाठी हे महत्त्वपूर्ण निर्णय लवकरात लवकर अंमलात यावेत, अशी मागणी या वेळी सुराज्य अभियानाच्या वतीने करण्यात आली. (BEST Bus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.