मनसे-भाजप युतीबाबत काय म्हणाले राज ठाकरे? वाचा…

90

गेल्या काही दिवसांपासून मनसे-भाजप युतीच्या चर्चांना राजकीय वर्तुळात चांगलेच उधाण आले आहे. यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या भाषणांच्या क्लिपवरुन मनसे-भाजप युतीचं सूत जुळवू नका, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

उत्तर भारतीयांवर केलेल्या भाषणांच्या क्लिप राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवल्या असल्याचे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी अशा कुठल्याही क्लिप चंद्रकांत पाटील यांना पाठवलेल्या नाहीत. त्यामुळे त्या क्लिपवरुन तुम्ही मनसे-भाजप युतीची भाकितं करू नका. माझी भूमिका स्पष्ट आहे. यावर आता चर्चा करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

(हेही वाचाः मी उद्धवजींना कधीही फोन करू शकतो… फडणवीसांचे मोठे विधान)

काय आहे त्या क्लिपमध्ये?

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत सुरुवातीच्या काळात घेतलेली भूमिका यामुळे उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याच्या भीतीने भाजप मनसे सोबत जाण्यास तयार नाही. जर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली तर नक्की विचार होऊ शकतो, असे सूचक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे खुद्द राज ठाकरे यांनीच चंद्रकांत पाटील यांना सांगितलं की त्यांच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास झाल्याचे सांगत, त्यांच्या भाषणाच्या क्लिप ते चंद्रकांत दादांना पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

(हेही वाचाः लोकलसाठी भाजप घेणार रेल्वे इंजिनाची साथ?)

काय म्हणाले होते फडणवीस?

आमची मनसेशी युतीबाबत कुठलीही चर्चा अजूनपर्यंत झालेली नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. मनसे हा काही आमचा शत्रू पक्ष नाही, परंतु त्यांच्या आणि आमच्या विचारांत तफावत आहे. भाषेच्या आधारावर केला जाणारा भेदभाव भाजपला मान्य नाही. आमची भूमिका ही कायमच हिंदुत्त्ववादी राहिली आहे. अलिकडे मनसेही हिंदुत्त्ववादी होत आहे, त्यामुळे नंतर त्याबाबत विचार केला जाईल, पण अजून तरी अशी कोणतीही चर्चा आमच्यात झालेली नाही, असे फडणवीस म्हणाले होते.

(हेही वाचाः भाजप-मनसे युतीबाबत फडणवीसांचे मोठे विधान! काय म्हणाले वाचा…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.