भाजप संविधान बदलणार असा खोटा काँग्रेस करत आहे. पण मोदींनी स्पष्टपणे सांगितले आहे कि संविधान बदलणार नाही. सर्वोच्च न्यायालयानेही तसे आदेश दिले आहेत. खरेतर आजवर संविधान ८० वेळा काँग्रेसने तोडले आहे. आणीबाणीच्या वेळी इंदिराजींनी संविधान असे तोडले कि लोकशाही तुटण्याच्या मार्गावर आली होती, असा घणाघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केला.
रामटेक येथे आयोजित प्रचारसभेत नितीन गडकरी बोलत होते. काँग्रेसवाले अल्पसंख्यांकांना घाबरवत आहेत, सुरक्षित राहायचे असेल तर पंजावर बटण दाब असे म्हणत आहेत. दलितांना म्हणतात संविधान बदलले जाणार, मतदारांनो हा खोटा प्रचार ओळखा, असे नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
(हेही वाचा Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे; फडणवीसांचा हल्लाबोल)
विदर्भातील सर्व १० जागा जिंकू, मोदींनी मेट्रोचे भुमिपूजन केले, ती मेट्रो कालगे गावापर्यंत येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा घेतलेली दीक्षाभूमी विकसित करण्याचा निर्णय घेतला, कोणताही निर्णय जात, पंथ यांच्या आधारावर होत नाही. ६० वर्षांत जे काँग्रेसने काम केले नाही ते १० वर्षांत मोदींनी केले. आम्ही केलेली कामे तुमच्यासमोर आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) म्हणाले.
Join Our WhatsApp Community