देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरु झाली आहे. आघाडी-बिघाडीचे खेळ आता बंद होण्याच्या मार्गावर असून बंडाळीचे खेळ सुरु झाले आहेत. अशातच या निवडणुकीची सर्वात महत्वाचा घटक म्हणजे मतदार, त्याच्या मनात काय आहे? याचा वेध घेण्याचा प्रयत्न ABP-C Voter यांनी घेतला. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जनता केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकारच्या कामावर नाखुश आहे. परंतु पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच यांना जनतेने पहिली पसंती दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदेंच्या कामावर समाधानी
केंद्र सरकारच्या कामावर ३५ टक्के महाराष्ट्रातील जनता असमाधानी असल्याचे म्हणत आहे, तर ३० टक्के लोकांनी केंद्राच्या कामावर समाधान व्यक्त केले. ४ टक्के लोकांनी आम्हाला काही माहिती नसल्याचे सांगितले. या प्रश्नातून केवळ ३० टक्केच जनता केंद्र सरकारच्या कामावर खुश असल्याचे दिसून येते. ABP-C Voter यांनी हा सर्व्हे केला आहे. पंतप्रधान म्हणून कुणाला पाहू इच्छिता असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला केला तेव्हा बहुतांश लोकांनी नरेंद्र मोदी हीच पहिली पसंती असल्याचे सांगितले. या प्रश्नासाठी लोकांना ४ पर्याय दिले होते. त्यात नरेंद्र मोदी, राहुल गांधी, दोघेही नाही किंवा अन्य असा पर्याय दिला होता. त्यात ६१ टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून मोदींनाच पसंती दिली. तर २९ टक्के लोकांनी राहुल गांधींना पर्याय म्हणून स्वीकारले. ६ टक्के लोकांनी हे दोघेही नको तर ४ टक्के लोकांनी अन्य असे उत्तर दिले. महाराष्ट्रातील जनता भलेही केंद्र सरकारच्या कामकाजावर समाधानी नसेल परंतु पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर ते समाधानी आहेत. पंतप्रधानांच्या कार्यशैलीवर प्रश्न विचारताच ४३ टक्के जनतेने ते खूप समाधानी असल्याचे म्हटले. तर २७ टक्के लोकांनी कमी समाधानी, २८ टक्के लोकांनी असमाधानी तर २ टक्के लोकांनी उत्तर देण्यास नकार दिला. महाराष्ट्रातील ३५ टक्के लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या कामकाजावर असमाधान व्यक्त केले. २८ टक्के असे लोक आहेत जे काहीसे समाधानी आहे, तर ३० टक्के लोकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामावर समाधानी आहेत. (Lok Sabha Election 2024)
Join Our WhatsApp Community