लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारीचे अर्ज भरण्याची २७ मार्च रोजी शेवटची तारीख आहे. (UBT Lok Sabha Candidates) भाजपच्या आतापर्यंत ३ उमेदवार याद्या जाहीर झाल्या आहेत. महाविकास आघाडीत जागावाटपावरून एकमत होत नसल्याने आघाडीतील उमेदवार याद्या रखडल्या होत्या. वंचितसोबत चालू असलेली बोलणीही फिस्कटत होती. अशात आता उबाठा गटाने आपली १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी X या माध्यमावर ही यादी घोषित केली आहे. (UBT Lok Sabha Candidates)
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील गडकरी आणि फडणवीसांवर मोठी जबाबदारी)
कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी
मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई (Anil Desai) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या व्यतिरिक्त १६ खासदारांची सूची ट्वीट करण्यात आली आहे.
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे..
*मुंबई दक्षिण मध्य:श्री अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे.
इतर 16 उमेदवार… pic.twitter.com/nPg2RHimSF— Sanjay Raut (@rautsanjay61) March 27, 2024
१. बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
२.यवतमाळ वाशिम – संजय देशमुख
३. मावळ – संजोग वाघेरे पाटील
४. सांगली – चंद्रहार पाटील
५. हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
६. संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
७. धाराशीव – ओमराजे निंबाळकर
८. शिर्डी – भाऊसाहेब वाघचौरे
९. नाशिक – राजाभाऊ वाजे
१०. रायगड – अनंत गीते
११. सिंधुदुर्ग-रत्नागिरी – विनायक राऊत
१२. ठाणे – राजन विचारे
१३. मुंबई-ईशान्य – संजय दिना पाटील
१४. मुंबई-दक्षिण – अरविंद सावंत
१५. मुंबई – वायव्य – अमोल कीर्तिकर
१६. परभणी – संजय जाधव
१७. मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई
हेही पहा –
Join Our WhatsApp Community