Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांची अटकेविरोधात हायकोर्टात धाव, कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा

134
Arvind Kejriwal : भाजपाचा विजय झाला, उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात असतील, मोदींच्या मोहिमेविषयी केजरीवाल काय म्हणाले?
Arvind Kejriwal : भाजपाचा विजय झाला, उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाचे नेते तुरुंगात असतील, मोदींच्या मोहिमेविषयी केजरीवाल काय म्हणाले?

दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी सत्र न्यायालयाच्या शुक्रवारी (२२ मार्च) दिलेल्या आदेशाविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली. त्यांनी सक्तवसुली संचालनालय रिमांडविरोधात पीएमएलए न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. (Arvind Kejriwal)

केजरीवाल यांनी दावा केला आहे की, आपल्याला करण्यात आलेली अटक आणि कोठडी या दोन्ही कारवाईसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बेकायदेशीर आहे. त्याची तात्काळ कोठडीतून सुटका करावी. विधी पथकाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणीही दिल्ली उच्च न्यायालयाने केली आहे.

१० दिवसांची कोठडीची ईडीकडून मागणी
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री अटक केल्यानंतर त्यांना शुक्रवारी (२२मार्च) राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने 28 मार्चपर्यंत सहा दिवसांची ईडी कोठडी (Arvind Kejriwal arrest news) सुनावली आहे. केजरीवाल यांना आता २९ मार्च रोजी दुपारी २ वाजता कोर्टात हजर केले जाणार आहे. विशेष न्यायमूर्ती कावेरी बावेजा यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल यांच्या १० दिवसांची कोठडीची मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

केजरीवाल यांना गुरुवारी रात्री सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. गुरुवारी रात्री ९.०५ वाजता केजरीवाल यांना अटक करण्यात आली. त्यांच्या १० दिवसांच्या कोठडीसाठी अर्ज दिला आहे, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) एसव्ही राजू न्यायालयासमोर सांगितले. यावेळी राजू यांनी यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या सेंथिल बालाजी प्रकरणाच्या निकालाची प्रत न्यायालयाला दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.