MLA Bachu Kadu: अमरावतीची जागा भाजपाला जाताच, बच्चू कडूंनी दिलं ‘हे’ उत्तर

336
MLA Bachu Kadu: अमरावतीची जागा भाजपाला जाताच, बच्चू कडूंनी दिलं 'हे' उत्तर

राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. यातच आता अमरावतीची जागा भाजपा लढवणार असून, रामटेकची जागा शिवसेना शिंदे गटाकडे राहील, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. अमरावती मतदारसंघात काही मतभेद होत असतात. बच्चू कडू किंवा अडसूळ यांचे मतभेद झाले असतील, मात्र देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे यासाठी बच्चू कडू ,अडसूळ सगळे प्रयत्न करतील. बच्चू कडू (MLA Bachu Kadu) आमच्यासोबत राहतील, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

बच्चू कडू यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “अशा परिस्थितीत अजिबात पाठिंबा राहणार नाही. ही जी स्थिती निर्माण केलेली आहे यामध्ये मानसिकता नाहीच. वेळ आली, तर बाहेर पडण्याचा निर्णय घेऊ” असं म्हटलं आहे तसेच “अमरावती लोकसभा मतदारसंघात माझे २ आमदार सोडून किमान १ लाख मते त्या भागात आहेत. खरा दावा तर आम्हीच करायला पाहिजे होता, पण आम्ही प्रामाणिकपणे काम करणं हे थोडं अंगलट येत आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation : सरकार मराठा आंदोलकांवरील किती गुन्हे घेणार मागे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली माहिती)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आम्ही थोडं अडचणीत येतोय, असं वाटायला लागलं आहे. वेळ आली, तर आम्ही उमेदवार देवूच. सुरुवात त्यांनी तोडायची केली आहे, तर आम्ही तोडू. आम्हालाही त्याचं वाईट वाटतंय. युतीतून बाहेर जायचं नाही, अशी आमची मनातील इच्छा आहे पण तुम्हाला ठेवायचंच नाही तर आम्ही एवढे काही गुलाम नाहीत. आम्ही एवढे लाचारही नाही.” असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.