महानगर गॅस लिमिटेड (Mahanagar Gas CNG Station) ग्राहकांना नैसर्गिक वायूच्या वापराला प्रोत्साहन देत असते. याकरिता कंपनीने गॅसच्या किमतीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. गॅस इनपुट कॉस्ट कमी झाल्यामुळे मुंबईत सीएनजी गॅसच्या (CNG)किमतीत रु. 2.5/Kg कपात करण्याची घोषणा केली आहे.
(हेही वाचा – Mumbai Crime : बेपत्ता झालेल्या मुलाचा महिनाभराने सापडला मृतदेह)
सीएनजीची सुधारित एमआरपी 5 मार्च 2024 च्या मध्यरात्रीपासून 6 मार्च सकाळपासून 73.50 रुपये प्रति किलोग्रॅम असेल. एमजीएलची सीएनजी किंमत आता पेट्रोलच्या तुलनेत 53% आणि मुंबईतील सध्याच्या किमतीच्या पातळीवर डिझेलच्या तुलनेत 22% बचत होते. त्यामुळे ग्राहकांना सुविधा, सुरक्षा, विश्वासार्हता आणि पर्यावरण अनुकूलता इत्यादी गोष्टींचा फायदा व्हायला मदत होते.
सीएनजीच्या किमतीत कपात झाल्यामुळे वाहतूक क्षेत्रात नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्यास मदत निश्चितच मदत होऊ शकेल. हे स्वच्छ आणि हरितक्रांतीच्या दिशेने भारताने टाकलेले पाऊल आहे, असे मत महानगर गॅस लिमिटेडने व्यक्त केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community