Maulana Arrest : गुजरातमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुंबईतील मौलानाला अटक

362
Sessions Courts: अपमानाचा सूड उगवण्यासाठी ३ महिन्यांच्या चिमुरडीची हत्या करणाऱ्या तृतीय पंथीयाला फाशीची शिक्षा
Sessions Courts: अपमानाचा सूड उगवण्यासाठी ३ महिन्यांच्या चिमुरडीची हत्या करणाऱ्या तृतीय पंथीयाला फाशीची शिक्षा

प्रक्षोभक भाषण (provocative speech) करून दोन समाजात तेढ निर्माण केल्या प्रकरणी मुंबई पूर्व उपनगरात राहणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अझहरी (Maulana mufti salman azhari) याला गुजरात एटीएसने (Gujrat Ats) घाटकोपरमधून रविवारी ताब्यात घेतले आहे. मौलानाला अटक करण्यासाठी आलेल्या गुजरात एटीएसला विरोध करण्यासाठी एका समुदायाचा गट रस्त्यावर उतरले होते. काही वेळासाठी घाटकोपर (ghatkopar) अमृतनगर येथे तणाव निर्माण झाला होता. स्थानिक पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत करून मौलानाला ताब्यात घेण्यात आले आहे.

घाटकोपर पश्चिम अमृत नगर येथे राहणारा मौलाना मुफ्ती सलमान अझरी (Maulana mufti salman azhari) याने गुजरात राज्यातील जुनागढ( junagad) येथे ३१ जानेवारी रोजी आयोजित एका धार्मिक कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण (provocative speech)केले होते. मौलाना मुफ्तीच्या भाषणा मुळे दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे जुनागढ पोलिसांनी कार्यक्रमाचे आयोजन मुहम्मद युसूफ मलेक(mohammad Yusuf malek), अझीम हबीब ओडेदारा (azim habib odedara) आणि मौलाना मुफ्ती सलमान अझरी याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम (IPC section) १५३(सी) (दोन समाजात तेढ निर्माण करणे), ५०५ (प्रक्षोभक भाषण करणे) १४४ (शांतता भंग करणे) १८८ (आदेशाचे उल्लंघन करणे) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा – Dr. Neelam Gorhe : मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी शासन कटीबद्ध – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे)

दरम्यान या गुन्ह्यात गुजरात एटीएसचे पथक मौलाना मुफ्ती सलमान अझरी याला अटक करण्यासाठी रविवारी मुंबईत दाखल झाले होते. गुजरात एटीएस आणि मुंबई एटीएसचे पथक मुफ्ती अझरी याच्या घाटकोपर अमृतनगर येथील घरी दाखल झाले असता स्थानिक नागरिकांनी मौलाना यांना अटक करण्यासाठी विरोध दर्शवत एका विशिष्ट समुदायाचा जमाव रस्त्यावर उतरला होता. दरम्यान, घाटकोपर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमावाला शांत करून मौलाना मुफ्तीला ताब्यात घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात पोहचले. गुजरात एटीएसने मौलाना याला ताब्यात घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यातील डायरीत नोंद करून मौलानाला घेऊन गुजरात एटीएसचे पथक गुजरात येथे रवाना झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.