-
ऋजुता लुकतुके
चेन्नई इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत गुरुवारी संध्याकाळच्या सत्रात तीन पदकं मिळाली. आणि यातील एक होतं प्राची गायकवाडने ५० मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात मिळवलेलं कांस्य पदक. सुरुवातीला प्राची पहिल्या पाचांतही नव्हती. स्टँडिंग प्रकारात आधीची पिछाडी भरून काढत तिने पहिल्या तीनात स्थान मिळवलं. तिचे या प्रकारात एकूण ४३९.६ गुण झाले. अनुष्का ठाकूर (४६०.८०) तर मेलविना एंजलिना (४५०.३) या कर्नाटक आणि तामिळनाडूच्या मुलांना अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळालं.
Bask in the glory of victory! Dive into the thrill of the #KheloIndia Youth Games hosted in Tamil Nadu.
Follow the medal tally, celebrate our champions! Stay connected! #KIYG2023 🏅🎉 pic.twitter.com/hOLOgpBFEW
— Khelo India (@kheloindia) January 25, 2024
महत्त्वाचं म्हणजे प्राची मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर शुटिंग रेंजमध्ये प्रशिक्षक अरुण वारेसी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिचे मुख्य प्रशिक्षक विश्वजीत शिंदे आहेत. तसेच वेगवेगळ्या स्पर्धांसाठी तिला गन फॉर ग्लोरी अकादमीतील बिबास्वान गांगुली व शुभम पाटील यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. प्राची हिचे वडील शशिकांत हे पोलीस दलात असून त्यांच्या प्रोत्साहनामुळेच लहानपणापासून प्राची हिला नेमबाजीची आवड निर्माण झाली.
(हेही वाचा – Republic Day : भगूर येथील सावरकर स्मारकात प्रजासत्ताक दिन साजरा)
तिने पाचव्या वर्षीच नेमबाजीच्या सरावास प्रारंभ केला. दहाव्या वर्षी ती एअर रायफलकडे वळली आणि इसवी सन २०२० पासून ती थ्री पोझिशन या प्रकारात भाग घेत आहे. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय खेळाडू स्वप्निल कुसाळे हे तिच्यासाठी आदर्श खेळाडू आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला यश मिळवायचे आहे. यापूर्वी तिने अखिल भारतीय स्तरावर कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
महाराष्ट्राच्या वेदांती भट हिचे मात्र कांस्यपदक थोडक्यात हुकले. तिला चौथे स्थान मिळाले. तिने ४२६.७ गुणांची नोंद केली. महाराष्ट्राला गुरुवारी बास्केटबॉलमध्येही सांघिक कांस्य पदक मिळालं. तर थाळीफेक प्रकारात भक्ती गावडेनं कांस्य जिंकलं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community