“शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत हे खोटं बोलत आहेत. राऊत यांनी काल बुधवारी पत्रकार परिषदेत दावा केला की वंचित आघाडीला महाविकास आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण गेले आहे, तो खोटा आहे,” असा असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी केला. (Sanjay Raut)
बिन बुलाए मेहमान
वंचित बहुजन आघाडीला (vanchit Bahujan Aghadi) अद्याप काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) या तीन पक्षाच्या नेत्यांची स्वाक्षरी असलेले कुठलेही पत्र अथवा निमंत्रण प्राप्त झालेले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीला “बिन बुलाए मेहमान” बनून आम्ही जाणार नाही, असे मोकळे यांनी स्पष्ट केले. (Sanjay Raut)
उबाठाने गैरफायदा घेऊ नये
“आम्हाला जोपर्यंत तिन्ही पक्षाच्या नेत्यांच्या सह्या असलेले अधिकृत निमंत्रण प्राप्त होत नाही तो पर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. आमची शिवसेनेसोबत युती आहे पण त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न संजय राऊत यांनी नये,” असा इशारा वंचितने दिला. (Sanjay Raut)
(हेही वाचा – Water Cut : भांडुपकरांवर पुन्हा पाण्याचे संकट; गुरुवारी नसेल ‘या’ भागात पाणी)
काँग्रेस थेट बोलणे टाळते
“वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडी आणि INDI मध्ये करावा अशी भूमिका आम्ही सातत्याने मांडत आलो आहोत. त्यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्र लिहिले आहे. मात्र अद्याप काँग्रेसकडून त्यावर कुठलेच उत्तर किंवा प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेस वंचित बहुजन आघाडी सोबत थेट बोलणी करणे का टाळत आहे,” याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. (Sanjay Raut)
काँग्रेसने सर्वाधिकार ऊबाठाला दिले का?
“महाविकास आघाडी आणि INDI च्या संदर्भात बोलणी करण्याचे Power of attorney सर्वाधिकार काँग्रेसने शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिले आहेत का?” असा सवालही मोकळे यांनी केला. (Sanjay Raut)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community