भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये २६ डिसेंबरपासून २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. हिंदुस्थानचे ३ स्टार खेळाडू या मालिकेला मुकणार आहेत. सलामीवीर खेळाडू ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याला दुखापत झाल्याने त्याने या मालिकेतून माघार घेतली आहे, तर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीतून सावरू शकलेला नाही. ईशान किशन (Ishan Kishan) याने वैयक्तिक कारणासाठी या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामागील कारण आता स्पष्ट झाले आहे.
ईशान किशन गेल्या बऱ्याच काळापासून टीम इंडियासोबत आहे, मात्र त्याला सातत्याने खेळण्याची संधी मिळाली नाही. संघातील एखादा नियमित खेळाडू जायबंदी झाल्यानंतर किशनचा संघात समावेश होत होता. मानसिक थकव्यामुळे ईशान किशनने आफ्रिका दौरा अर्धवट सोडला आणि माघारी परतला, असा दावा यात करण्यात आला आहे. आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतून माघार घेण्यामागे हेच कारण असल्याची चर्चा होती.
(हेही वाचा – Ind vs SA 3rd ODI : साई सुदर्शन भारताचा मालिकेतील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक)
ईशान किशनच्या जागी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर हिंदुस्थानी ‘अ’ संघाबरोबर असलेल्या के. एस. भरतची वर्णी लागली आहे. किशनच्या जागी संधी मिळालेल्या के. एस. भरतने देशासाठी ५ कसोटी सामने खेळले असून ज्यात त्याने १८.४२ च्या सरासरीने १२९ धावा केल्या आहेत.
हेही पहा –