Thane Police Commissioner : ठाणे पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे, जयजीत सिंग एसीबीचे प्रमुख 

353
Thane Police Commissioner : ठाणे पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे, जयजीत सिंग एसीबीचे प्रमुख 
Thane Police Commissioner : ठाणे पोलीस आयुक्तपदी आशुतोष डुंबरे, जयजीत सिंग एसीबीचे प्रमुख 
राज्याच्या विधानसभा हिवाळी अधिवेशनादरम्यान ठाणे पोलीस आयुक्त (Thane Police Commissioner) बदलण्यात आले आहे. ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदी १९९४च्या आयपीएस बॅचचे आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आली असून जयजीत सिंग यांना राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(हेही वाचा-Onion Issue : कांदा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

आशुतोष डुंबरे हे १९९४च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या ते राज्य गुप्तचर विभागाचे प्रमुखपदी होते.पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका, आंबेगावचे सुपुत्र म्हणून त्यांची ओळख आहे. आशुतोष डुंबरे यांनी यापूर्वी ठाणे पोलीस दलात २०१६ मध्ये सहपोलिस आयुक्त होते, बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येसह अनेक हायप्रोफाईल प्रकरणे डुंबरे यांनी हाताळली होती. मितभाषी आणि मृदू स्वभावाचे म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख आहे.
ठाणे पोलीस दलात सहपोलिस आयुक्त पदावर असताना त्यांनी अनेक प्रकरणे योग्य रित्या हाताळली होती, पोलीस दलासाठी अनेक उपक्रम त्यांनी आणली होती, तसेच ठाण्यातील वाहतूक नियोजनावर त्यांनी चांगले काम केले होते, त्याच बरोब ठाणे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यावर त्यांनी भर दिला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.