राज्यभर २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी (Grampanchayat Results) रविवार ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. २ हजार ९५० सदस्य पदे आणि १३० सरपंचाच्या रिक्त पदांसाठीही ही पोटनिवडणूक झाली. त्याची आज म्हणजेच सोमवार ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होत आहे. नक्षलग्रस्त भाग वगळता राज्यातील अन्य ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज होत आहे, तर नक्षलग्रस्त भागांमध्ये मंगळवारी (७ नोव्हेंबर) मतमोजणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा कौल आज स्पष्ट होणार आहे.
राज्यातील नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आजची मतमोजणी विशेष महत्त्वाची ठरणार आहे.
9 वाजेपर्यंत झालेले मतदान | |||||||
भाजप | शिंदे | ठाकरे | कॉंग्रेस | शरद पवार | अजित पवार | इतर | Total |
६५ | ५४ | २० | २३ | १८ | ६६ | १३ | २५९ |
महत्त्वपूर्ण घडामोडी:
- पिंपळगावात ५ जागा अजित पवार गटाकडे
- सोलापूर-बार्शी तालुक्यात पहिला निकाल हाती
- कोल्हापुरात मतमोजणीला सुरुवात
- सोलापूर जिल्ह्याचा पहिला निकाल जाहिर
- जठारवाडी ग्रामपंचायत स्थानिक आघाडीच्या ताब्यात