विवियन ली (Vivian Lee) ही भारतात जन्मलेली ब्रिटिश अभिनेत्री होती. तिचा जन्म ५ नोव्हेंबर १९१३ रोजी भारतात झाला. कारण तिचे वडील भारतात नोकरीला होते. त्या काळी अनेक ब्रिटिश नागरिक भारतात राहत होते. ते कलकत्त्याला पिगॉट चॅपमन या कंपनीत काम करत होते. तिचे सुरुवातीचे शिक्षण भारतात उटकमंड देहरादून येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ती लंडनला गेली. तिथे तिला अभिनयात रुची वाटू लागली. तिची आई जुन्या विचारांची होती. आपल्या मुलीने अशा क्षेत्रात जाऊ नये असे तिला वाटत होते मात्र विवियन (Vivian Lee) लहानपणापासून खुल्या विचारांची आणि जिद्दी होती. आईचा विरोध मोडून तिने ’रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स’मध्ये प्रवेश घेतला.
मात्र अवघ्या १९व्या वर्षी तिने बॅरिस्टर हर्बर्ट ली हॉलमनशी लग्न केले. तिचा नवरा हा बड्या कुटुंबातला होता व प्रतिष्ठित वकील होता. तो तिच्यापेक्षा जवळजवळ १३ वर्षांनी मोठा होता. लग्नाआधी तिने नाटकात काम करायला सुरुवात केली होती. तिच्या अभिनयाची कारकीर्द १९३५ मध्ये सुरु झाली. “द बॅश” या नाटकातून आणि “थिंग्ज आर लुकिंग अप” या चित्रपटातून तिने या क्षेत्रात पदार्पण केले.
ती खूप प्रसिद्ध अभिनेत्री असली तरी तिचे वैयक्तिक जीवन फारसे चांगले नव्हते. तिला मानसिक त्रास होत होता. ती वैवाहिक जीवनातही सुखी नव्हती. एका मुलाला जन्म दिल्यानंतर तिने पुन्हा नाटकांत कामे करायला सुरुवात केली. तेव्हा तिची ओळख लॉरेन्स ऑलिव्हियर सोबत झाली. तो देखील अभिनेता होता व शेअक्सपियरच्या नाटकांतून अभिनय करायचा. सुरुवातील मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी लग्न केलं.
विवियन ली (Vivian Lee) या अभिनेत्रीने ऑक्सर पुरस्कार देखील जिंकला आहे. गॉन विथ द विंड हा तिचा गाजलेला चित्रपट. या चित्रपटासाठी तसेच अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर या दोन चित्रपटांसाठी तिला ऑस्कर मिळाला. ॲन्टनी ॲन्ड क्लिओपात्रा, ए डेलिकेट बॅलन्स, किंग लियर, द स्किन ऑफ टीथ, मॅकबेथ, हॅम्लेट अशा नाटकांतून तिने आपल्या भूमिका अजरामर केल्या आहेत. तसेच अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर, गॉन विथ द विंड, फायर ओव्हर इंग्लंड, दॅट हॅमिल्टन वूमन, दि एलिफंट वॉक, सीझर ॲन्ड क्लिओपात्रा अशा चित्रपटांत तिने काम केले आहे.
तिच्या कारकीर्दीत तिला प्रचंड यश लाभले. तिचे तिच्या दुसर्या पतीशीही पटेनासे झाले. तिला अधनंमधनं वेडाचे झटके येऊ लागले. तिचा सेक्रेटरी सनी लॅशने तर तिला अत्यंत वेड्यासारखं वागताना प्रत्यक्ष पाहिलं होतं. मानसिक तणावाविरुद्ध झगडताना टीबी या रोगानेही ती ग्रस्त झाली. एकीकडे प्रचंड यश आणि दुसरीकडे भयंकर रोग अशी तिची अवस्था झाली होती. ७ जुलै १९६३ रोजी रात्री ती झोपली आणि सकाळी उठलीच नाही. प्रसिद्धीच्या झोतात असताना अवघ्या ५३ व्या वर्षी तिने मृत्यूला कवटाळले.
Join Our WhatsApp Community