Anti Terror Conference : भारताचे संरक्षण धोरण आणखी आक्रमक होणार; दिल्लीत आजपासून दहशतवादविरोधी परिषद

118
Anti Terror Conference : भारताचे संरक्षण धोरण आणखी आक्रमक होणार; दिल्लीत आजपासून दहशतवादविरोधी परिषद
Anti Terror Conference : भारताचे संरक्षण धोरण आणखी आक्रमक होणार; दिल्लीत आजपासून दहशतवादविरोधी परिषद

दहशतवाद मुळापासून नष्ट करण्यासाठी भारताची भूमिका आता कठोर होत चालली आहे. (Anti Terror Conference) दिल्लीतील दहशतवादविरोधी विभागाचे प्रमुख दहशतवाद संपवण्यासाठी या परिषदेत  योजना तयार करण्यात येणार आहे. या बैठकीत भारत आक्रमक -संरक्षणात्मक सिद्धांत (offensive defence) स्वीकारणार असल्याचे सांगितले जात आहे. भारत गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानच्या चिथावणीवरून देशात सुरू असलेला दहशतवाद सहन करण्याच्या मनस्थितीत नाही. दहशतवादाच्या बाबतीत आतापर्यंत बचावात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या भारताने आता आपले धोरण बदलून आता आक्रमक धोरण स्वीकारले आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी आज दिल्लीत मोठी बैठक होणार आहे. या २ दिवसीय बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देशभरातील एटीएस प्रमुखांची भेट घेतील आणि दहशतवादाचा कायमचा शेवट  करण्यासाठी रणनीती तयार करतील. (Anti Terror Conference)

(हेही वाचा – Sikkim Flood : सिक्कीममध्ये हाहाकार; भीषण पुरात आत्तापर्यंत ८ जवानांसह २२ ठार, काय घडले ‘त्या’ रात्री)

5 आणि 6 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीत खलिस्तानी कारवाया, दहशतवादी कारवाया आणि गॅंगस्टरवर कडक कारवाई करण्याची रणनीती आखली जाणार आहे. एनआयएच्या ‘अँटी टेरर कॉन्फरन्स 2023’ या नावाने होणाऱ्या या बैठकीत देशभरातील एटीएसचे पोलिस प्रमुख सहभागी होणार आहेत. या बैठकीत परदेशातून खलिस्तानी-दहशतवादी आणि गॅंगस्टर  यांच्यावर कारवाई करण्याचा आराखडाही तयार केला जाणार आहे.

गुप्तचर प्रमुखांचाही समावेश असेल

एनआयए, आयबी आणि रॉचे प्रमुखही या बैठकीला उपस्थित राहतील आणि देशासमोरील सुरक्षा आव्हानांची माहिती देतील. अहवालानुसार, या बैठकीत आयबी, एनआयए आणि एटीएससह विविध एजन्सींमध्ये दहशतवादी कारवायांची माहिती एकत्रित करता यावी, यासाठी एक यंत्रणा देखील तयार केली जाईल.

आक्रमक-संरक्षणात्मक सिद्धांत (offensive defence) राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांचा आहे. NSA होण्यापूर्वी अजित डोवाल हे एका कार्यक्रमात या सिद्धांताविषयी सविस्तर बोलले होते. ते म्हणाले होते की, सध्या भारताचे दहशतवादाबाबतचे धोरण बचावात्मक आहे, म्हणजे जेव्हाही हल्ला होतो, तेव्हा ते बचाव करण्यास सुरुवात करते. एक वेळ अशी येईल की भारताला आक्रमक व्हावे लागेल. स्वतःचे संरक्षण करण्याबरोबरच दहशतवादाचा प्रतिकारही करावा लागेल. (Anti Terror Conference)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.