महाराष्ट्रात शाळा बंद करणार, अशी अफवा पसरवण्यात येत आहे. हे चुकीचे आहे. असे कधीही होणार नाही. एकही शाळा बंद होणार नाही, असा खुलासा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी केला.
बुधवारी, सावंतवाडी य़ेथे आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज ते एक दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हा खुलासा केला. तसेच यावेळी अफवा पसरवणारे कोण तेही मला माहित नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
(हेही वाचा – Tuljapur Solapur Highway Closed : तुळजापूर-सोलापूर महामार्ग तीन दिवस बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती)
ते पुढे म्हणाले की, एकही शाळा बंद होणार नाही. राज्यात शाळा बंद, बार ना परवाने असे कधीही शक्य नाही. याबाबत कोण अफवा पसरवतोय हे मला माहित नाही. ज्या शाळा नादुरुस्त आहेत. त्याबाबत आम्ही माहिती घेतो याचा अर्थ बंद करण्याचा कोणताही उद्देश नाही, असेही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community