Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकावरील गर्दीची कोंडी लवकरच फुटणार; काय होणार बदल ?

175
Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकावरील गर्दीची कोंडी लवकरच फुटणार; काय होणार बदल ?
Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकावरील गर्दीची कोंडी लवकरच फुटणार; काय होणार बदल ?

दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र.1 आणि 2 वरील गर्दीची कोंडी लवकरच फुटणार आहे. (Dadar Railway Station) मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. यामुळे 15 सप्टेंबरपासून दादरहून सुटणाऱ्या लोकल्स परळमधून सुटणार आहेत आणि दादरपर्यंत धावणाऱ्या लोकल्स परळपर्यंत धावणार आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 हा रुंदीने छोटा आहे. येथून धीम्या लोकल जात असल्याने येथे नेहमीच प्रवाशांची तुंडूब गर्दी असते. यामुळे अपघाताची देखील भिती असते. यामुळेच मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.

रुंदी वाढल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 1 चे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर फूट ओव्हर ब्रिजच्या पायऱ्यांची रुंदी वाढवणे देखील सुलभ होईल. तसेच प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर नवीन एस्केलेटरची तरतूद देखील सुलभ होईल. सध्या दादर प्लॅटफॉर्म क्र. 1/2 मध्ये एकूण 2 फूट ओव्हर ब्रिज आहेत. या रुंदीकरणाच्या कामासाठी, दादर प्लॅटफॉर्म क्र.1 वरून सुरू होणाऱ्या/समाप्त होणाऱ्या सर्व स्लो लोकलचा विस्तार परळ उपनगरीय टर्मिनसपर्यंत करण्यात आला आहे. (Dadar Railway Station)

(हेही वाचा – Values and Life Skills : उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार)

प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ची रुंदी वाढवणार

15 सप्टेंबर 2023 पासून, दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणाच्या पायाभूत सुविधांच्या कामासाठी, दादर स्थानकावरून टर्मिनेशन/ओरिजनेट लोकल परळपर्यंत वाढवल्या जातील आणि या सेवा परळ येथून सुरू होतील. गर्दीचे उत्तम व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या प्रवासाच्या सोयीसाठी दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दादर प्लॅटफॉर्म क्र. 1 ची सध्याची लांबी 270 मीटर आणि रुंदी 7 मीटर आहे. सध्याची रुंदी 7 मीटरवरून 10.5 मीटर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रुंदी अतिरिक्त 3.5 मीटरने वाढेल. हे काम शुक्रवारपासून सुरू होणार आहे. यासाठी 1 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. पुढील 2 महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. (Dadar Railway Station)

असे आहे लोकलचे बदललेले वेळापत्रक

• ठाणे-दादर 08.07 वाजता दादरला पोहोचणारी 08.13 वाजता परळला पोहोचेल आणि 08.17 वाजता परळहून कल्याणसाठी निघेल.
• टिटवाळा-दादर 09.37 वाजता दादरला पोहोचणारी परळला 09.42 पोहोचेल आणि कल्याणसाठी 09.40 वाजतापरळहून कल्याणसाठी निघेल .
• कल्याण-दादर 12.55 वाजता दादरला पोहोचणारी, 12.58 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी 13.01 वाजता निघेल.
• ठाणे-दादर 17.51 वाजता दादरला पोहोचणारी 17.54 वाजता परळला पोहोचेल आणि 17.56 वाजता परळहून डोंबिवली साठी निघेल.
• ठाणे-दादर 18.10 वाजता दादरला पोहोचणारी परळपर्यंत धावेल आणि 18.13 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी 18.15 वाजता निघेल.
• डोंबिवली-दादर 18.35 वाजता दादरला पोहोचेल, 18.38 वाजता परळला पोहोचेल आणि कल्याणसाठी 18.40 वाजता परळ निघेल.
• ठाणे-दादर 19.03 वाजता दादरला पोहोचणारी 19.06 वाजता परळला पोहोचेल आणि 19.08 वाजता परळ कल्याणसाठी निघेल.
• डोंबिवली-दादर 19.39 वाजता दादरला पोहोचणारी, 19.42 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून डोंबिवलीसाठी 19.44 वाजता निघेल.
• ठाणे-दादर 19.49 वाजता दादरला पोहोचणारी 19.52 वाजता परळला पोहोचेल आणि 19.54 वाजता परळ ठाणे साठी निघेल.
• कल्याण-दादर 20.20 वाजता दादरला पोहोचणारी, 20.23 वाजता परळला पोहोचेल आणि परळहून कल्याणसाठी 20.25 वाजता निघेल.
• ठाणे-दादर 22.20 वाजता दादरला पोहोचणारी 22.23 वाजता परळला पोहोचेल आणि 22.25 वाजता ठाणे साठी निघेल. (Dadar Railway Station)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.