Organ Donation : ऑगस्टमध्ये मुंबईत अवयवदानाचा टक्का सुधारला

मुंबईत आठ महिन्यात अवयवदानाची आकडेवारी 31 वर पोहोचली

150
Organ Donation : ऑगस्टमध्ये मुंबईत अवयवदानाचा टक्का सुधारला
Organ Donation : ऑगस्टमध्ये मुंबईत अवयवदानाचा टक्का सुधारला
मुंबईत अवयवदानाचा टक्का घसरत असताना यंदाच्या ऑगस्ट महिन्यात पाचवेळा अवयदान झालेत. या पाच अवयवदानामुळे मुंबईत आठ महिन्यात अवयवदानाची आकडेवारी 31 वर पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसात सलग दोन वेळा अवयव दान झालेत, अशी माहिती मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली.
गेल्या दोन दिवसातील घटना
मंगळवारी 29 ऑगस्ट रोजी लीलावती रुग्णालयात 36 वर्षांचा इसमाला अत्यावस्थ अवस्थेत दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी इसमाला मेंदू मृत घोषित केले. मेंदूमृत अवस्थेत रुग्ण बरे होण्याची शक्यता कमी असते. रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयव दानाला संमती दिल्यानंतर फुफ्फुस आणि दोन मूत्रपिंडाचे दान करण्यात आले. मुंबई विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीकडून अवयवांचे दान करण्यात आले. मुंबईतील हे 30वे अवयवदान होते.
बुधवारी 30 ऑगस्ट रोजी 68 वर्षीय इसमाकडून मरणोत्तर अवयवदान झाले. रुग्णाला अत्यावस्थ अवस्थेत ब्रिज कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्ण मेंदू मृत अवस्थेत गेल्याने रुग्णालयातील अवयवदान समन्वयकांनी नातेवाईकांना अवयवदान प्रक्रियेबद्दल समजावले. नातेवाईकांनी रुग्णाच्या मृत्यूपश्चात यकृत, दोन मूत्रपिंडे आणि डोळ्याच्या बुबुळ्यांचे दान केले. मुंबईतील हे 31 वे अवयवदान होते.
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला 5 ऑगस्टला वाशी येथे 25 वर्षाच्या तरुणाने मृत्यूपश्चात हृदय,यकृत,मूत्रपिंडे आणि दोन डोळ्यांचे दान केले. दुसऱ्या दिवशी सहा ऑगस्टला जसलोक रुग्णालयातून 43 वर्षीय इसमाकडून हृदय, यकृत, मूत्रपिंडे, डोळे आणि फुफ्फुसाचे दान झाले. 18 ऑगस्ट रोजी 59 वर्षीय वृद्धाने नवी मुंबईत यकृत,त्वचा, डोळे आणि हाडांचे दान केले.
अवयव प्रत्यारोपण म्हणजे काय? 
मृत व्यक्तीच्या किंवा जिवंत व्यक्तीच्या फुफ्फुसाचा किंवा मूत्रपिंडाचा काही भाग शस्रक्रियेद्वार विलग करुन गरजू रुग्णाच्या शरीरात देणे म्हणजे अवयव प्रत्यारोपण होय. ही प्रमाणित वैद्यकीय उपचार पद्धती आहे.
कोणत्या अवयवांचे दान करता येते
० मृत रुग्णाचे हृदय बंद पडले असेल तर केवळ डोळे आणि त्वचेचे दान करता येते. हृदय बंद पडल्याने इतर अवयवांना रक्त पुरवठा बंद झालेला असतो. इतर सर्व अवयव प्रत्यारोपणासाठी बाद ठरलेले असतात.

० उपचारादरम्यान किंवा अपघातानंतर रुग्ण कित्येकदा मेंदू मृत अवस्थेत जातो. या अवस्थेत रुग्णाची जगण्याची शक्यता नसते. परंतु हृदयप्रक्रिया सुरु असते. मेंदू मृत रुग्णाकडून अनेक अवयवांचे दान करता येते. मूत्रपिंडे, फुफ्फुसे, यकृत, स्वादुपिंडे, हृदय, आतडी, नेत्र, त्वचा, हृदयाची झडप आणि कानाचे ड्रम यांचे दान करता येते

(हेही वाचा- NCB Action : ड्रग्स माफीयांनी ड्रग्सच्या पैशांतून कुत्र्या मांजरांच्या नावावर संपत्ती केली खरेदी)

अवयवदान कायदेशीर प्रक्रिया
० देशात मानवी अवयव प्रतिरोपण कायदा १९९४ नुसार मेंदू मृत डॉक्टरांनी विशिष्ट चाचण्यानंतर घोषित करणे आणि अवयवदान या दोघांनाही कायदेशीर मान्यता आहे.
० मेंदू मृत मृत्यू हा प्रत्यारोपणासाठी मान्यता असलेल्या रुग्णालयातील डॉक्टरांच्या तपासाअंती घोषित केला जातो.
० माननी अवयवांच्या व्यापाराला या कायद्यात कायदेशीर मान्यता नाही. तसेच या कार्यात कोणताही आर्थिक व्यवहार करता येत नाही.
० दात्याच्या कुटुंबीयांना अवयव मिळालेल्या रुग्णाचे नाव व पत्ता दिला जात नाही. कायद्यानुसार यासाठी परवानगी दिली जात नाही. रुग्णालादेखील दात्याची तसेच त्याच्या कुटुंबीयांची माहिती दिली जात नाही.
अवयवदानाची प्रक्रिया
० जिवंतपणीच रुग्णाने अवयवदानाचा निर्णय घेतला असेल तर रुग्णाने कुटुबीयांना याबाबतची कल्पना देणे आवश्यक ठरते. कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय रुग्णाकडून मृत्यूपश्चात अवयवदान करता येत नाही.

० अवयवादासाठी प्रत्येक राज्यातील रुग्णालये तसेच रुग्णालयाशी निगडीत अवयव प्रत्यारोपण समिती कार्यरत असतात.

हेही पहा- https://www.youtube.com/watch?v=hoPBumq_POM

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.