गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. दिल्लीमध्ये पूरजन्य स्थिती आहे तर हिमाचलमध्ये ढगफुटीने नागरिक हैराण झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील कियास गावात सोमवारी, १७ जुलै रोजी सकाळी ढगफुटी झाली. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले. तसेच ९ वाहने देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली. अशातच उत्तराखंड आणि यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
रविवारी, १६ जुलै रोजी हरिद्वारमध्ये गंगेच्या पाण्याची पातळी २९३.१५ मीटर नोंदवण्यात आली, तर धोक्याचे चिन्ह २९४ मीटर आहे. याच पार्श्वभूमीवर नदीलगत असलेल्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देवप्रयाग येथे गंगा नदीचा प्रवाह २० मीटरने आणि ऋषिकेशला पोहोचेपर्यंत १० सेमी वाढला. वाराणसी आणि प्रयागराजमध्ये पुराच्या पाण्याने घाट बुडू लागले आहेत. पुराच्या प्रवाहामुळे काही छोटी मंदिरे आधीच पाण्याखाली गेली आहेत.
(हेही वाचा – Sharad Pawar : पुन्हा होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीला शरद पवार जाणार नाही; चर्चांना उधाण)
दुसरीकडे, सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत दिल्लीत यमुनेच्या पाण्याची पातळी २०५.५० मीटरपर्यंत पोहोचली. तर, गेल्या तीन तासांत २०५.४५ च्या पातळीपर्यंत नोंद झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community