वंदना बर्वे
हातात टाळ…. डोक्यावर पांढरी टोपी….मुखाने राम कृष्ण हरी… जय हरी विठ्ठलाचा जप करीत दिल्लीकर मराठीजनांनी राजधानीत महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविले.
सकाळी सहा वाजता पासून सुरु झालेल्या वारीमध्ये महाराष्ट्रीयन नऊवारी नेसलेल्या स्त्रिया….. पांढरे धोतर नेसलेली पुरुष मंडळी आणि अस्सल मराठी वेशभूषेतील बच्चे कंपनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती, हे विशेष. कॅनॉट प्लेस येथील प्राचीन हनुमान मंदिरातुन सुरु झालेल्या वारीचा समारोप आर के पुरम येथील विठ्ठल मंदिरात करण्यात आला. विठ्ठल मंदिरात देखील भाविकांनी दर्शन तर घेतलेच शिवाय फुगडी देखील खेळले. कीर्तन… भजन… फुगडी.. यामुळे आपण आज दिल्लीत राहतोय…. हे विसरून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या भाविकांमुळे वातावरण भक्तीमय झाले होते.
(हेही वाचा – Narendra Modi : पंतप्रधानांच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठक; गरीब आणि वंचितांवर विशेष लक्ष द्या – मोदी)
आषाढीला पंढरपुरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रत्येक वारकरी आसुसलेला असतो. केव्हा एकदा विठुरायाचे दर्शन घेतो आणि डोळेभरुन बघतो, अशी भावना प्रत्येकाची असते. याच भावनेतून राजधानीत स्थायीक झालेल्या मराठी वासीयांनी आषाढी सोहळयानिमीत्त वारीचे आयोजन दिल्लीत केले होते. दिल्लीकर मराठीजनांनी दिल्लीतच आषाढी एकादशीनिमित्त सांकेतिक वारी सोहळा आयोजित करण्याची परंपरा सुरु केली आहे. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या वतीने पहाटे सहा ते सकाळी दहा या वेळेत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.
दिल्लीतील हनुमान मंदीर कॅनॉट प्लेस पासून सुरु झालेली वारी आरकेपुरम येथील विðल रुकिमीनी मंदीरात समारोप झाला. नाचत गात विठुनामाचा गजर करीत गुडगाव, दिल्ली, नोएडा येथील मराठी नागरिक मोठया संख्येने वारीत सहभागी झाले होते. यासाठी दिल्ली मराठी प्रतिष्ठान अनेक मराठी सोहळे दरवर्षी असेच उत्साहात साजरे करतात. यामुळे मराठी नागरिकांचा उत्साह देखील वाखाण्याजोगा असतो, हे महत्वाचे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community