Narendra Modi : नरेंद्र मोदींना इजिप्तचा सर्वोच्च नागरी सन्मान! ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ पुरस्काराने केला गौरव

228

अमेरिकेच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्त दौऱ्यावर आहेत. जागतिक स्तरावर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचा मोठा गौरव करण्यात आला आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कैरो येथे ऑर्डर ऑफ द नाईल पुरस्काराने सन्मानित केले. हा इजिप्तचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.

तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचले. पंतप्रधान मोदी यांनी हेलिओपोलिस वॉर मेमोरियल आणि अल हकीम मशिदीला भेट दिली. पंतप्रधानांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे. या दौऱ्यावेळी या दौऱ्यादरम्यान इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव केला. गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला हा १३ वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

(हेही वाचा Jawaharalal Nehru: जवाहरलाल नेहरूंमुळे भारताचा फुटबॉल संघ ऑलिम्पिकमध्ये खेळाला होता अनवाणी )

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय इजिप्त दौऱ्यावर असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची कैरो येथे भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.