मुंबईत रुग्णांचा आकडा तीन हजार पार: मृत्यूचा आकडा दोन अंकावर

मुंबईमध्ये अधिकाधिक रुग्ण हे इमारतींमध्ये आढळून येत असून आतापर्यंत मुंबईत ३०५ इमारती सिल करण्यात आल्या आहेत. तर ३४ झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहे. 

109

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढू लागला असून शुक्रवारी दिवसभरात तब्बल ३,०६२ रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील डिसेंबर महिन्यानंतर प्रथमच मृत्यूची संख्या दुहेरी आकड्यांवर जावून पोहोचली आहे. यापूर्वी २६ डिसेंबर रोजी १२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एक अंकांमध्ये पोहाचलेली मृत्यूची संख्या आता तीन महिन्यांनी पुन्हा दोन अंकामध्ये पोहोचली आहे.

केवळ १,३३४ रुग्ण बरे होवून घरी परतले!

मुंबईमध्ये गुरुवारी, १८ मार्च रोजी २,८७७ रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी, १९ मार्च रोजी ३ हजार ०६२ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख ५५ हजार ८९७ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात १,३३४ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. त्यामुळे बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाख २३ हजार २८१ रुग्ण आढळून आले आहेत.

(हेही वाचा : मुंबईत दीड महिन्यांत ४५ लाख लसीकरणाचे लक्ष्य!)

मुंबईत ३०५ इमारती सिल करण्यात आल्या!

सध्या मुंबईमध्ये २० हजार १४० सक्रीय रुग्ण असून या सर्वांवर उपचार सुरु आहेत. तर दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी ८ रुग्णांना दिर्घकालिन आजार होते, यामध्ये पाच पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. तीन रुग्णांचे वय हे चाळीशीच्या पुढे होते, तर सात रुग्णांचे वय हे ६० वर्षांपुढील होते. त्यामुळे आतापर्यंत एकूण मृत्यूची संख्या ही ११ हजार ५६५ एवढी झाली आहे. सुरुवातीच्या काळात वाढलेली मृत्यूची संख्या दिवाळीनंतर कमी २० ते ३०च्या आतमध्ये आलेली होती. त्यानंतर जानेवारीपासून ही संख्या १०च्या आतमध्ये येवून चार ते पाचवर सीमित होती. परंतु मागील दोन ते तीन दिवसांपासून ही संख्या वाढत जावून शुक्रवारी दहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये अधिकाधिक रुग्ण हे इमारतींमध्ये आढळून येत असून आतापर्यंत मुंबईत ३०५ इमारती सिल करण्यात आल्या आहेत. तर ३४ झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहे. 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.