जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथे दहशतवादी कारवाई Terrorist Attack दरम्यान लष्कराचे ५ जवान हुतात्मा झाले. परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही घटना जम्मू भागातील भाटा धुरियन येथील तोटा गली भागातील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजौरी सेक्टरच्या कंडी जंगलात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विशेष माहिती मिळाली होती. यावर लष्कराने ३ मे रोजी संयुक्त कारवाई सुरू केली. ५ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास शोध पथकाला गुहेत दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. खराब हवामान आणि संततधार पावसात ही चकमक सुरू झाली. लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी बॉम्बचा स्फोट केला. या Terrorist Attack हल्ल्यात एका अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले. जखमींना हेलिकॉप्टरने उधमपूर कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. या कारवाईत काही दहशतवादीही मारले गेल्याचा अंदाज आहे. दहशतवाद्यांना हुसकावून लावण्यासाठी कारवाई सुरू आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून शोधमोहीम तीव्र केली आहे.
(हेही वाचा Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादीची ‘पॉवर’ कोणाच्या हातात? लवकरच निर्णय होण्याची शक्यता)
Join Our WhatsApp Community