अखिल भारत हिंदु महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी (वय ६० वर्षे) यांचे १ जून या दिवशी दुपारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर मुंबई येथील केईएम् रुग्णालयात मागील २ दिवसांपासून उपचार चालू होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रभाव होता
विशेष म्हणजे श्री रामजन्मभूमी आंदोलन सर्वात आधी हिंदु महासभेने सुरू केले होते. त्यावेळी प्रमोद पंडित हे या आंदोलनात सहभागी होते. पुढे हे आंदोलन न्यायालयात गेल्यावर पक्षकार म्हणून प्रमोद पंडित जोशी यांनी जबाबदारी सांभाळली. प्रमोद पंडित जोशी यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रभाव होता. वीर सावरकर यांचे विचार ते माध्यमांमध्ये प्रभावीपणे मांडत असत. वृत्तवाहिन्यांमधील चर्चासत्रात प्रमोद पंडित जोशी हे हिंदुत्वाची बाजू हिरीरीने मांडत असत. त्यामुळे माध्यमांमध्ये ते कायम चर्चेत असत.
(हेही वाचा राम मंदिराच्या गर्भगृहाची योगींच्या हस्ते पायाभरण)
Join Our WhatsApp Community