राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना गुरूवारी परळ येथील पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती केईएमच्या रुग्णालय प्रशासनाने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, उच्च रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढल्याने त्यांना ऍडमिट केले गेले. तपासाअंती त्यांना रक्तदाब वाढल्याचे आढळून आले. शिवाय हृदयाचे ठोके पूर्ववत होण्यासाठी त्यांना आज शुक्रवारी एक दिवस रुग्णालयात ठेवून घेतल्याची माहिती रुग्णालयाने दिली. उद्या, शनिवारी अनिल देशमुख यांना डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाकडून दिली गेली.
(हेही वाचा – विनाकारण हॉर्न वाजवणं पडणार महागात; मुंबई पोलीस राबवणार ‘ही’ अनोखी मोहीम)
Join Our WhatsApp Community