भारताच्या स्वातंत्र्यकाळात १४ ऑगस्ट १९४७ हा अत्यंत काळा दिवस ठरला. या दिवशी भारताची फाळणी झालीच, शिवाय लाखो हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले, त्यांचा वंशविच्छेद झाला. त्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या विविध समविचारी संघटना मागील अनेक दशकांपासून ‘१४ ऑगस्ट’ हा ‘अखंड भारत संकल्प दिवस’ म्हणून साजरा करतो. यानिमिताने या दिवशी देशभरात भारतीय नागरिक आणि हिंदूंना सजग केले जाते, त्यांच्यामध्ये राष्ट्राप्रती जागृती निर्माण केली जाते, याच उद्देशाने मुंबईतून राष्ट्र्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते, त्याच्या समारोप अखंड भारताचे स्वप्न पाहिलेलं स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरणी करण्यात आला.

देशभरात केली जाते जनजागृती
मुंबईत मागील १४ वर्षांपासून या रॅलीचे आयोजन करण्यात येते आणि त्याचा समारोप स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे करण्यात येतो. यंदाही शेकडोच्या संख्येने पदाधिकाऱ्यांची रॅली स्मारकात दाखल झाली. त्यानंतर याठिकाणी रॅलीचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी बजरंग दलाचे माजी कोकण प्रांत संयोजक उमेश गायकवाड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धर्मजागरण मंच, परळ विभाग संयोजक नितीन म्हात्रे, बजरंग दल शहर विभाग संयोजक दिनेश स्वर्णकार आणि विहिंप शहर विभाग सहमंत्री राजीव चौबेजी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
१९४७ ची पुनरावृत्ती नको – उमेश गायकवाड
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही भारतात पुन्हा फाळणीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, याकरता सर्वांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. ज्या ज्या भागात हिंदू अल्पसंख्यांक होतो, तो तो भाग देशापासून विलग होतो, त्यामुळे भारतात गल्लोगल्ली हिंदूंची संख्या कमी करून मुस्लिम लोकसंख्या जाणीवपूर्वक वाढवण्याचा प्रयत्न होत आहे, यापासून सतर्क राहून हा कट हाणून पडण्याचे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे, असे बजरंग दलाचे माजी कोकण प्रांत संयोजक उमेश गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
Join Our WhatsApp Community