मुंबई गोराई चारकोपमध्ये रहिवाशी इमारतीतील चौथ्या मजल्यावरुन लिफ्ट वेगात खाली आदळल्याने एका 62 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. नगीना अशोक मिश्रा असे या मृत महिलेचे नाव आहे. गोराई चारकोपमधील हायलॅंड ब्रिज इमारतीत ही घडली आहे. या घटनेनंतर लिफ्टमुळे होणा-या अपघातांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सुरुवातीला विजेचा शाॅक लागल्याने नगीना मिश्रा यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. पण आता यात मिळालेल्या नव्या माहितीनुसार, नगीना मिश्रा यांचा मृत्यू हा लिफ्ट वेगाने खाली आदळल्याने झाला आहे.
( हेही वाचा: Blue Tick: ट्वीटरवर ब्लू टिक असणा-यांना आता मिळणार ‘या’ खास सुविधा; मस्क यांची घोषणा )
चारकोप परिसरातील हायलॅंड ब्रिज या इमारतीत चौथ्या मजल्यावर राहणारी 62 वर्षीय महिला 21 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता माॅर्निंग वाॅकला जाण्यासाठी लिफ्टने खाली जात होती. लिफ्ट अचानक तिस-या चौथ्या मजल्याच्या मध्यभागी अडकली. यामुळे घाबरुन महिलेने आपल्या मुलाला आवाज दिला. त्यानंतर मुलगा पळत पळत आला आणि त्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला लिफ्टचा दरवाजा उघडला नाही. लिफ्ट अतिवेगाने तळमजल्यावर जाऊन आदळली. लिफ्ट आदळल्यामुळे तळ भागाला दोन मोठे छिद्र पडले. या दुर्घटनेत त्या वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली. यानंतर जखमी अवस्थेत महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डाॅक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या घटनेच्या संदर्भात अधिक तपास करत आहेत.
Join Our WhatsApp Community