सर्वोत्कृष्ट मराठी ८ पुस्तके; एकदा नक्कीच वाचा!

मृत्युंजय :  शिवाजी सावंत यांची महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेवर आधारित असलेली मृत्युंजय ही अप्रतिम कादंबरी तुम्ही नक्कीच वाचावी. दानशूर, अंगराज, सूर्यपुत्र कर्ण, अशा या कर्णावर नियतीने अविरत घाव घातले. या केले. या कादंबरीत कर्णाची अगदी हुबेहूब साकारली आहे.

युगंधर :  शिवाजी सावंत यांचीच दुसरी कादंबरी ही प्रभू श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित आहे. पुराण आणि चमत्कारामध्ये अडकून पडलेल्या श्रीकृष्णाचं शिवाजी सावंत यांनी या कादंबरीतून सहज व तितकच विराट दर्शन घडवले आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे ही कादंबरी वाचत असताना श्रीकृष्ण कोणी भगवान, परमात्मा न राहता तो कधी आपला सखा बनून जातो हे आपल्याला कळतच नाही.

पानिपत : तुम्हाला जर ऐतिहासिक पुस्तके वाचण्याची आवड असेल, तर तुम्ही विश्वास पाटील यांचे पानिपत हे पुस्तक नक्की वाचले पाहिजे. इतिहासाचा बारकाईने अभ्यास करून अगदी पुराव्यानिशी हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. 

संभाजी : विश्वास पाटील यांचेच दुसरे पुस्तक संभाजी, ही देखील एक सुंदर कादंबरी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास त्यांनी या पुस्तकाद्वारे मांडला आहे. हे अत्यंत प्रेरणादायी पुस्तक प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा वाचलीच पाहिजे. 

ययाती : वि.स. खांडेकर यांची ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी, ययाती ही कादंबरी महाराष्ट्रात लोकप्रिय ठरली. ही कादंबरी मराठी, गुजराती, इंग्रजी आणि अन्य काही भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आली. 

श्रीमान योगी : रंजीत देसाई लिखित छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत श्रीमान योगी ही कादंबरी. खरे तर छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्त थरारक आणि अद्भुत जीवन पुस्तकाद्वारे मांडणे म्हणजे केवळ अशक्य. पण रंजीत देसाई यांनी हे शिवधनुष्य त्यांच्या लिखाणातून पेलले आहे आणि म्हणूनच हे प्रेरणादायी स्रोत असलेले पुस्तक आपण नक्कीच वाचावे.

असा मी असामी  पु.ल. देशपांडे यांचे धमाल विनोदी पुस्तक 'असा मी असामी' याचे नाव जेवढे विनोदी आहे, तेवढेच विनोदी हे पुस्तक देखील आहे. पुलंच्या विनोदाची जबरदस्त ताकद जर तुम्हाला अनुभवायची असेल तर हे पुस्तक तुम्ही वाचलेच पाहिजे. 

श्यामची आई : साने गुरुजी लिखित श्यामची आई हे पुस्तक म्हणजे मातृ प्रेमाचा मंगल स्तोत्र आहे, असे खुद्द आचार्य अत्रेंनी स्पष्ट केले आहे. लहानपणी प्रत्येक मुलाला वाचनाची गोडी लावायची असेल, तर त्याला फक्त श्यामची आई हे पुस्तक पर्याय आहे.