भारतातील विविध प्रांतामध्ये कशी आहे चित्रकला?

जागतिक कला दिन २०२४ हा दरवर्षी १५ एप्रिल रोजी साजरा होतो. भारतातील विविध प्रांतात चित्रकलेचे स्वरूप निरनिराळे आहे. ज्यात इतिहास, पौराणिक कथा आणि संस्कृतीचा समावेश आहे. या चित्रकलेचे विविध प्रकार जाणून घेऊया...

महाराष्ट्र : वारली :  वारली हा प्रकार कोकण भागातील आदिवासी जमातीची वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैली आहे. महाराष्ट्र राज्यातील लोकसंस्कृतीचे एक वैशिष्ट्य म्हणून या कलाप्रकाराकडे पाहिले जाते.

राजस्थान : फड :  फड हा चित्रकलेचा प्रकार राजस्थानातील आहे. ही धार्मिक चित्रकला शैली आहे. पारंपरिकपणे कापडाच्या लांब तुकड्यावर किंवा कॅनव्हासवर चित्रे रेखाटले जातात. देवी-देवतांची कथा या फडांवर रेखाटली जाते. 

पश्चिम बंगाल : कालीघाट : पश्चिम बंगालमध्ये अठराव्या शतकात हा चित्रकलेचा प्रकार उदयास आला. यात शिव–पार्वती, नृसिंह, राधा–कृष्ण, ब्रह्म, कृष्ण–बलराम, सरस्वती, राम–सीता; तसेच रामायण –महाभारतातील अन्य व्यक्ती इत्यादींची चित्रे आहेत.

केरळ :  म्युरल :  या चित्रांतून समाजप्रबोधन केलेले जाते किंवा छोट्या बच्चे कंपनीसाठी खास संदेश दिले जातात. या चित्रांचा उद्देश काही असो, पण ती क्षणभर आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. भिंतीवर काढलेल्या या चित्रांना ‘म्युरल’ म्हणतात.

तमिळनाडू : तंजोर :  तंजावर चित्रकला ही एक शास्त्रीय दक्षिण भारतीय चित्रकला शैली आहे. यात शास्त्रीय नृत्य आणि संगीत-तसेच साहित्याला प्रोत्साहन दिले जाते. मंदिरांमध्ये मुख्यतः हिंदू धार्मिक विषयांची चित्रे ही त्यांच्या सोन्याच्या कोटिंगद्वारे ओळखली जातात. 

मध्य प्रदेश :  गोंड कला:  गोंड कला हा एक आदिवासी कला प्रकार आहे.  जो मध्य भारताच्या गोंड जमातीने विकसित झाला. ही कला मुळात डोंगर, नाले आणि जंगलांवर आधारित आहे. गोंड चित्रे चालीरीती आणि सणांच्या सन्मानार्थ रेखाटली जातात.