चैत्र नवरात्रोत्सव कसा साजरा कराल? जाणून घ्या...

चैत्र नवरात्रोत्सवाला मंगळवार, ९ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षात प्रतिपदेपासून हे नवरात्र साजरे केले जाते. या दिवशी हिंदू नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला सण असतो. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते, तर काही ठिकाणी देवघरातच देवीला स्वतंत्र स्थान देऊन ९ दिवस दुर्गेच्या ९ रुपांची पूजा केली जाते.

चैत्र नवरात्रात 'या' गोष्टी करणे टाळा -   - चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो फलाहार करावा. उपवास करणेच शक्य नसेल, तर केवळ दोन वेळ सात्त्विक भोजन ग्रहण करावे.

उपवासाबरोबरच मद्य किंवा इतर व्यसन करू नये. ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा. मनात तामसी विचारही आणू नयेत.

शारदीय नवरात्रात आपण ज्याप्रमाणे कांदा-लसूण व्यर्ज करतो. त्याप्रमाणे चैत्र नवरात्रातही ९ दिवस कांदा-लसूण खाणे टाळावे.

साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे वडे, बटाट्याची भाजी, वेफर्स अशा प्रकारचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. फलाहार करावा. शरीरातील मिठाचा अभाव भरून काढण्यासाठी सैंधव मिठाचा वापर करावा.

या काळात कोणतीही चुकीची कामे करू नये. कोणाबद्दल वाईट विचारही मनात आणू नये. व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक, सात्विक असतील, तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल.

नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी. केस आणि नखे कापू नयेत.

चैत्र नवरात्राचे ९ दिवस नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून पुरोहितांकडून किंवा अन्य जाणकारांकडून श्रवण करावे.

चैत्र नवरात्रोत्सव कसे साजरे कराल? जाणून घ्या...

चैत्र नवरात्रोत्सव कसे साजरे कराल? जाणून घ्या...