अबुधाबीचे पहिले हिंदू मंदिर

राम मंदिरासारखेच एक भव्य मंदिर मुस्लिम राष्ट्र अबुधाबीमध्ये बांधले आहे.

या मंदिराचे उद्घाटन १४ फेब्रुवारीला नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले.

यूएई अरब देशांमधले हे पहिलेच भव्य मंदिर आहे. 1997 पासून या मंदिराचे काम सुरू झाले आणि 2024 मध्ये पूर्ण झाले. 

हे मंदिर सुमारे 55 हजार चौरस मीटर जागेत तयार झाले असून भारत आणि यूएई यांच्यातल्या सामंजस्याचे प्रतीक म्हणून हे मंदिर बांधले गेले आहे. 

या मंदिराची उंची 108 फूट आहे. त्यात 40 हजार घनमीटर संगमरवर आणि 180 घनमीटर वाळूचे खडक वापरण्यात आले आहेत. 

मंदिरावर बारीक नक्षीकाम आहे, त्यातल्या मूर्ती भारतात तयार करण्यात आल्या आहेत.

जवळपास 700 कोटी रुपयांचा खर्च मंदिराच्या उभारणीसाठी करण्यात आला असून अनेकांकडून निधीदेखील देण्यात आला आहे.