रामलल्लाचे विशेष चांदीचे नाणे सरकारने केले जारी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाविकांसाठी रामलल्ला यांचे विशेष चांदीचे नाणे जारी केले आहे.
याशिवाय त्यांनी बुद्ध आणि एक शिंग असलेला गेंडा यांच्यावर असलेली आणखी दोन नाणीही जारी केली आहेत.
ही चांदीची नाणी ५० ग्रॅम वजनाची असून ९९९ शुद्ध चांदीपासून बनवलेली आहेत.
रामलल्ला आणि अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या संदर्भात जारी केलेले हे नाणे ५० ग्रॅम वजनाचे असून ते शुद्ध चांदीचे आहे.
त्याची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.
सरकारचे अधिकृत संकेतस्थळ https://www.indiagovtmint.in/souvenir-coinsया साईटवर राम मंदिराचे चांदीचे नाणे तुम्ही खरेदी करू शकता.