'या' चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज

कारचा जास्त वेग   इलेक्ट्रिक कारची चांगली रेंज मिळवायची असेल तर कारचा वेग नियंत्रणात ठेवावा. इलेक्ट्रिक गाडी जास्त वेगाने चालवली तर रेंज कमी होऊ शकते. असे वाहन जास्त वेळ वापरल्यानेही बॅटरी खराब होते आणि बॅटरी लवकर संपू शकते. यासोबतच कारवरही विपरीत परिणाम होऊन नुकसान होण्याचा धोका वाढतो.

फास्ट चार्ज करणे तुम्ही इलेक्ट्रिक कारमध्ये सतत फास्ट चार्जर वापरत असाल तर बॅटरीचे नुकसान होऊ शकते. असे केल्याने, कार चालवताना बॅटरीच्या क्षमतेवर परिणाम होतो. परिणामी बॅटरीची रेंज कमी होऊ शकते. शक्य तितक्या सामान्य चार्जरने इलेक्ट्रिक कार चार्ज करावी. याच्या मदतीने बॅटरीचे आयुष्य आणि रेंज अधिक काळ टिकवून ठेवता येते..

जास्त सामान जर तुम्ही इलेक्ट्रिक कार चालवत असाल आणि तुम्हाला त्यातून चांगली रेंज हवी असेल तर तुम्ही तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त सामान घेऊन कधीही प्रवास करू नका. अनेक वेळा लोक त्यांच्या इलेक्ट्रिक कारमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सामान ठेवतात किंवा काही वेळा ते क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवतात. त्यामुळे देखील कारची रेंज कमी होऊ शकते.

बॅटरीचा पूर्ण वापर करणे इलेक्ट्रिक कारची बॅटरी पूर्णपणे संपेपर्यंत वापरू नका. जेव्हा गाडीची बॅटरी 10 ते 20 टक्के राहते तेव्हा कार चार्ज करावी. असे केल्याने बॅटरीची रेंज टिकून राहण्यास मदत होते. पण ती वारंवार चार्ज केली तरी बॅटरी खराब होते आणि रेंज कमी होऊ शकते.

सर्व्हिसिंग न करणे इलेक्ट्रिक कारची सर्व्हिंसिंग वेळेवर करावी. यामुळे कारचे आणि बॅटरीचे आयुष्य वाढते. तसेच इलेक्ट्रिक कारच्या टायरची देखील काळजी घ्यावी.