उन्हाळ्यात 'ही' ७ फळे खा; निरोगी राहा !

खरबूज  उन्हाळ्यात खरबुजाचे सेवन केल्याने शरीराला थंडावा मिळतो. उन्हाळ्याच्या दिवसात तहान लागण्याचे प्रमाण वाढते. शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. या दिवसांत खरबूज खाल्ल्याने तहान भागते. या फळात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंटस् असतात तसेच जीवनसत्त्वांचे प्रमाणही जास्त असते. खरबुजाचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन शीतलता मिळते.

कलिंगड उन्हाळ्यात कलिंगडाचे सेवन जास्त प्रमाणात करावे. कलिंगडामध्ये अँण्टीऑक्सीडेंट, जीवनसत्त्व बी, सी तसेच डी मोठ्या प्रमाणात असते. कलिंगडाचे सेवन केल्याने शरीराची ऊर्जा भरून निघायला मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 

संत्र संत्र्यामध्ये जीवनसत्त्व सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे संत्र अवश्य खावे. यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त प्रमाणात असते. वजन कमी करण्यासाठी संत्र खाणे फायदेशीर ठरते.

पपई पपई हे सहज उपलब्ध होणारे फळ आहे. यामध्ये जीवनसत्त्व ए आणि सी असते. उन्हामुळे त्वचा काळवंडते. अशावेळी त्वचेला पपईचा गर १० ते १५ मिनिटे लावून ठेवावा. नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. असे केल्याने चेहरा ताजातवाना होतो. 

पेरू उन्हाळ्यामध्ये भूक मंदावते. या दिवसांत पेरूचे सेवन केले तर भूक लागते. आम्लपित्ताच्या त्रासावर आराम मिळतो. पेरूमध्ये विटामिन सी असल्याने पेरूचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

द्राक्ष उन्हाळ्याच्या दिवसांत आहारात द्राक्षांचा समावेश अवश्य करावा. द्राक्षे खाल्ल्याने लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदना आणि जळजळ बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होते. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांत ज्यांनो डोकेदुखीचा त्रास होतो, त्यांनी द्राक्ष खाल्ल्याने डोकेदुखीचे प्रमाण कमी होते. मन शांत राहते.