‘गगनयान’ मिशनसाठी 4 अंतराळवीरांची निवड

गगनयान मिशन हे भारताचं पहिलं ह्युमन स्पेस फ्लाईट आहे. 2025 मध्ये हे लॉन्च केलं जाईल.

या मिशन अंतर्गत चार अंतराळवीरांना 400 किलोमीटर अंतरावरून पृथ्वीच्या लोअर ऑर्बिटमध्ये पाठवलं जाईल.

दोन ते तीन दिवस हे अंतराळवीर तिथे संशोधन करतील. त्यानंतर हिंदी महासागरात त्यांना उतरवलं जाईल.

केरळच्या तिरुअनंतपुरममधल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिशन गगनयानच्या  चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  या चार अंतराळवीरांचा देशाला परिचय करून दिला आणि स्वत: या अंतराळवीरांना ॲस्ट्रॉनॉट्स विंग्स घातले.

प्रशांत बालकृष्णन नायर ‘सोर्ड ऑफ ऑनर’चे ते मानकरी आहेत. कॅट ए फ्लाइंग इन्स्ट्रक्टर ते राहिलेत. सुखोई-30 एमकेआय, मिग-21, मिग-29, हॉक डॉर्निअर आणि एएन-32सारख्या अन्य विमानांच्या उड्डाणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे.

ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन 2 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. सुखोई 30 एमकेआय, मिग -21, मिग-29, जॅग्वार, डॉर्निअर आणि एएन-32 सारख्या अन्य विमानांच्या उड्डाणाचा अनुभव अजित कृष्णन यांच्याकडे आहे.

ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप अंगद प्रताप हेदेखील एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. डिसेंबर 2004 मध्ये भारतीय वायुदलात ते रुजू झाले. सुखोई 30 एमकेआय, मिग-21, मिग-29, जॅग्वार, हाँक, डॉर्निअर आणि एएन-32 सारख्या अन्य विमानांच्या उड्डाणाचा अनुभव आहे.

विंग कमांडर शुभांशू शुक्ला विंग कमांडर हे एनडीएचे माजी विद्यार्थी आहेत. जून 2006 मध्ये भारतीय वायुदलात रुजू झाले. 2 हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे. सुखोई ३० एमकेआय, मिग-21, मिग-29, जॅग्वार, हाँक, डॉर्निअर आणि एएन-32 यांचा अनुभव आहे.