Uddhav Thackeray स्वतःला ‘पेद्रे’ का म्हणाले?

136
Uddhav Thackeray स्वतःला ‘पेद्रे’ का म्हणाले?
Uddhav Thackeray स्वतःला ‘पेद्रे’ का म्हणाले?

शिवसेना ऊबाठा प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल रविवारी २९ सप्टेंबर २०२४ रोजी नागपूर (Nagpur) येथे भाषण केले मात्र ठाकरे त्यावेळी प्रचंड गोंधललेले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. (Uddhav Thackeray)

पुन्हा ‘हिंदू’

गेली अनेक वर्षे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरे हेदेखील भाषणाची सुरुवात ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी करत असत. मात्र, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत महाविकास आघाडीत आल्यानंतर, विशेषतः गेल्या लोकसभा निवडणुकीपासून ठाकरे यांनी जाहीर सभेला संबोधित करताना ‘हिंदू’ (Hindu) हा शब्द कटाक्षाने टाळायला सुरुवात केली होती. रविवारी अचानक त्यांनी पुन्हा एकदा ‘हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी सुरुवात केली आणि लोकांच्या भुवया उंचावल्या.

(हेही वाचा – BMC : मुंबईतील उद्यान, मैदानांच्या देखभाल कंत्राटात संगनमत? महापालिका प्रशासन आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे करेल का?)

याचा अर्थ हिंदू हा शब्द टाळल्यामुळे त्यांना मुस्लिम मतांचा फायदा लोकसभा निवडणुकीत करून घ्यायचा होता आणि ‘त्यांच्या’ अपेक्षेप्रमाणे तो झालाही. आता विधानसभा मतदार संघ तुलनेने लहान असल्याने मुस्लिम मतांवर विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळणे अशक्य असल्याने पुन्हा एकदा ‘हिंदू नारा’चा आधार घ्यावा लागला असल्याची चर्चा होत आहे. (Uddhav Thackeray)

पेद्रे गेले कोर्टात..

याच भाषणात ठाकरे यांनी स्वतःला ‘पेद्रे’ असेही संबोधले. आणि चूक लक्षात येताच तात्काळ सुधारणा केली. नुकत्याच झालेल्या सिनेट निवडणुकीत (senate elections) शिवसेना ऊबाठा यांची विद्यार्थी संघटना ‘युवा सेने’ १० जागांवर विजय मिळवला. त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे म्हणाले, “ही निवडणूक रविवारी होणार होती पण हे पेद्रे गेले कोर्टात..आपलं.. ते पेद्रे यांनी केली निवडणूक रद्द मग आपण गेलो कोर्टात.” असे म्हणत न्यायालयाच्या आदेशानंतर ही निवडणूक रविवारऐवजी बुधवारी घेण्यात आल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – आयुर्वेदिक औषधांच्या प्रचार, प्रसारावर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी भर द्यावा; Union Minister Prataprao Jadhav यांचे आवाहन)

मशालीतला अंधार

“रविवारची निवडणूक (सिनेट) (senate elections) बुधवारी घेतली, म्हणजे सुट्टीच्या दिवसाच्या दिवशी घेणार होते, सुट्टीच्या दिवशी, पण बुधवारी घेतली तरी आपण जिंकलो. आणि हेच चित्र आज मला राज्यभर दिसतं आहे,” असे बोलून ठाकरे यांनी न्यूज चॅनलना आवाहन केले की हे चित्र त्यांनी टिपावे. “जरी अंधार असला तरी आता मशाल पेटलेली आहे, हा मशालीतला अंधार, अंधार जो आहे तो मशाल आता दूर करून काय काय कुठपर्यंत पोचले ते दाखवा जनतेला,” असे ठाकरे पुढे म्हणाले.

(हेही वाचा – Thane Metro – ठाणे-बोरिवली भुयारी मार्गासाठी १८ हजार ८०० कोटी मंजूर)

मी ‘औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक..

इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृह मंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांच्यावर टीका करताना स्वतःलाच ‘औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक’ (Aurangzeb fab club) म्हणून गेले. काही दिवसांपूर्वी अमित शाह नागपूरला येऊन गेले असे सांगतानाच ठाकरे म्हणाले, “दोन महिन्यापूर्वी ते पुण्याला थोड्या दिवसांनी माझा पुण्यातच कार्यक्रम. ठोकला तिकडे. तिकडे मला म्हणाले होते ‘औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक’ उद्धव ठाकरे. मी जर ‘औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेन तर तुम्ही अहमद शाह अब्दाली,” असे ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.