मुंबईत महापालिकेत कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची ३८० पदे रिक्त

49
मुंबईत महापालिकेत कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची ३८० पदे रिक्त
मुंबईत महापालिकेत कनिष्ठ आणि दुय्यम अभियंत्यांची ३८० पदे रिक्त

मुंबई महापालिकेतील २४ विभाग कार्यालयांसह विविध विभागांमधील अभियंत्यांची अनेक पदे रिक्त असून परिणामी महापालिकेच्या विविध नागरिक सेवासह सुविधा प्रकल्पांवर या अभियंत्यांच्या रिक्त पदांमुळे मोठा परिणाम होत आहे. विविध श्रेणीतील तब्बल ३८० पदे रिक्त असून ही पदे न भरल्याने कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता पदाच्या स्तरावरील कामाचा भार वाहताना इतर अभियंत्यांना अधिकचा ताण सहन करावा लागत आहे.

मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी संवर्गातील दुय्यम अभियंता व कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) विभागाची जवळ जवळ २५० पदे रिक्त आहेत. तसेच, तांत्रिक व विद्युत विभागाची जवळपास १३० पदे रिक्त आहेत. त्या रिक्त पदांमुळे सध्या कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंत्यांवर कामाचा बोजा प्रचंड वाढलेला आहे.

(हेही वाचा – जी-२० शिखर परिषदेच्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर ३१ कोटींची विद्युत रोषणाई)

बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना निवेदन देऊन ही रिक्तपदे तातडीने भरण्याची मागणी केली आहे. आपल्या संघटनेच्यावतीने आयुक्तांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनातही १३ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या बैठकीतही ही पदे त्वरीत भरण्याचे निर्देश दिले होते. परंतु सात महिने उलटून गेल्यानंतरही ही पदे भरण्याची कार्यवाही केली नसल्याने आयुक्तांना पुन्हा एकदा स्मरणपत्र देऊन या पदांकरिता जाहिरात देऊन ही रिक्त पदे त्वरित भरण्याची मागणी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील नालेसफाईच्या कामांमध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम उपनगराच्या नालेसफाई दरम्यान दिले होते. त्यानुसार महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार प्रभारी पर्जन्य जलअभियंता विभास आचरेकर यांनी दोन दुय्यम अभियंता तसेच कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आधीच या तळातील अभियंत्यांची अनेक पदे रिक्त असून कनिष्ठ अभियंत्यांचा भारही दुय्यम अभियंत्यांवर पडत असतानाही ते आपली जबाबदारी योग्यप्रकारे करत आहेत. तरीही त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याने अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.