Raj Thackeray : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर राज ठाकरे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

देशाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या आणि देशहिताचे निर्णय घेणाऱ्या संसदेच्या (Central Vista) नविन इमारतीचे उद्घाटन आज म्हणजेच २८ मे, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

267
Raj Thackeray : नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर राज ठाकरे यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

(हेही वाचा – new parliament building inauguration : नवीन संसद भवन स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न साकार करणारे माध्यम बनेल – पंतप्रधान नरेंद्र मोदी )

देशाच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या आणि देशहिताचे निर्णय घेणाऱ्या संसदेच्या (Central Vista) नविन इमारतीचे उद्घाटन आज म्हणजेच २८ मे, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. संसदेची नवी इमारत हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प होता, जो आज पूर्ण झाला आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः या इमारतीच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं आणि आज त्यांनी स्वतः या वास्तूचं उद्घाटन केलं. याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध झाला.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“आज देशाच्या नवीन संसदभवनाचं लोकार्पण झालं. संसदभवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे. ह्या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, ह्या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो.” अशा शब्दांत त्यांनी (Raj Thackeray) आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही पहा – 

नवीन संसद भवनाच्या (Central Vista) कामात वापरले जाणारे सागवान लाकूड नागपुरातून आणले आहे. लाल-पांढरे वाळूचे खडे राजस्थानमधील सर्मथुरा येथून आणले आहेत. लाल किल्ला आणि हुमायूंच्या थडग्यातही हे खडेवापरण्यात आले. भगवा हिरवा दगड उदयपूर येथून, लाल ग्रॅनाइट अजमेरजवळील लाखा येथून आणि पांढरा संगमरवरी राजस्थानातील अंबाजी येथून आणला गेला आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या चेंबर्समध्ये फॉल्स सिलिंगसाठी स्टील स्ट्रक्चर दमण-दीव येथून खरेदी करण्यात आले आहे. फर्निचर मुंबईत बनते. राजस्थानातील राजनगर आणि नोएडा येथून दगडी जाळीचे काम करण्यात आले. गेला. अशोक चिन्हासाठी साहित्य महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानमधील जयपूर येथून मागवण्यात आले होते. दुसरीकडे, भिंतीवरील अशोक चक्र मध्य प्रदेशातील इंदूर येथून आणण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.