Kanishka Plane Blast: कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला वाहिली श्रद्धांजली, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला सज्जड दम; म्हणाले…

160
Kanishka Plane Blast: कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला वाहिली श्रद्धांजली, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला सज्जड दम; म्हणाले...
Kanishka Plane Blast: कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवाद्याला वाहिली श्रद्धांजली, भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला सज्जड दम; म्हणाले...

कनिष्क विमान अपघाताचा (Kanishka Plane Blast) रविवारी (२३ जून) ३९वा स्मृतिदिन आहे. यानिमित्त भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी रविवारी त्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी कॅनडाच्या संसदेत खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरला श्रद्धांजली वाहण्यात आली, याबाबत भारताकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कनिष्क विमान अपघाताचा उल्लेख करून दहशतवादाच्या मुद्द्यावरून कॅनडाला फटकारले आहे. याविषयीची पोस्ट त्यांनी त्यांच्या अधिकृत “X”वरही पोस्ट केली आहे.

एस जयशंकर यांनी ‘X’वर केलेल्या एका पोस्टमध्ये लिहिले की, “आज इतिहासातील सर्वात वाईट दहशतवादाच्या कृत्यांपैकी एकाची ३९वा स्मृतिदिन आहे. १९८५ मध्ये आजच्याच दिवशी मरण पावलेल्या AI 182 ‘कनिष्क’ च्या ३२९ प्रवाशांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. ही जयंती आपल्याला याची आठवण करून देते की, दहशतवाद कधीही खपवून घेतला जाणार नाही,” असा सज्जड दमही कॅनडाला दिला.

(हेही वाचा – Eknath Shinde : लोकसभा मतदारसंघात पराभव झाला तरी…; सुजय विखे यांना मुख्यमंत्र्यांनी दिला मोलाचा सल्ला)

भारतीय वाणिज्य दूतावासाने मृतांना श्रद्धांजली वाहिली
कॅनडाच्या व्हँकुव्हरमध्ये असलेल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने १९८५मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क विमानात झालेल्या बॉम्बस्फोटात बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ”भारत दहशतवादाचा मुकाबला करण्यात आघाडीवर आहे आणि या जागतिक धोक्याचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांसोबत जवळून काम करत आहे,” असे दूतावासाने ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.

दहशतवाद्यांनी कनिष्क विमानाला बॉम्बने उडवले
खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध बिघडले आहेत. अशातच मंगळवारी, (दि.१८ जून) निज्जरच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कॅनडाच्या संसदेत मौन पाळण्यात आले होते. त्यावरून एका भारतीय वंशाच्या खासदाराने कॅनडाच्या संसदेतून खलिस्तानी समर्थकांवर जोरदार टीका केली. खासदार चंद्रा आर्य यांनी संसदेला खलिस्तानी दहशतवाद्यांनी कनिष्क विमानाला बॉम्बने उडवल्याचीही आठवण करून दिली.

त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
२३ जून १९८५ रोजी मॉन्ट्रियल, कॅनडातून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अटलांटिक महासागरावरून उडताना कोसळले होते. कॅनडास्थित खलिस्तानी दहशतवाद्यांनी या विमानात बॉम्ब ठेवला होता. या हल्ल्यात ३२९ लोक मारले गेले, ज्यात २६८ कॅनडा, २७ ब्रिटिश आणि २४ भारतीय नागरिकांचा समावेश होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.