Ganeshotsav 2023: गणपतीची मूर्ती शाडू माती की पीओपीची, मूर्तिकारांनी शोधून काढली आगळीवेगळी संकल्पना

मूर्तिकारांचे गणेशभक्तांना आवाहन

26
Ganeshotsav 2023: गणपतीची मूर्ती शाडू माती की पीओपीची, मूर्तिकारांनी शोधून काढली आगळीवेगळी संकल्पना
Ganeshotsav 2023: गणपतीची मूर्ती शाडू माती की पीओपीची, मूर्तिकारांनी शोधून काढली आगळीवेगळी संकल्पना

गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच गणेशभक्तांची सध्या तयारीकरिता लगबग सुरू आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान भाविकांनी विकत घेतलेली मूर्ती शाडू मातीची आहे की पीओपीची इतकंच नाही, तर ही मूर्ती कुठल्या मूर्तीकाराने बनवली आहे, हे ओळखणं आता सहज शक्य होणार आहे; कारण शाडू माती आणि पीओपीची मूर्ती ओळखण्याकरिता पारंपरिक मूर्तीकार आणि कारागीर संघाने एक आगळीवेगळी संकल्पना शोधून काढली आहे.

या अनोख्या संकल्पनेचा प्रयोग सर्वप्रथम नागपुरात करण्यात आला. येथील मूर्तीकारांनी एकत्र येऊन ‘क्यूआर कोड’ संकल्पना तयार केली आहे. मूर्तीकार आणि हस्तकला कारागीर संघाच्या नेतृत्वाखाली हा कोड तयार करण्यात आला आहे. हे कोड प्रत्येक मूर्तीकाराला देण्यात येणार आहेत. ग्राहकाने दुकानाच्या प्रवेशद्वारावर लागलेला क्यूआर कोड स्कॅन केल्यास त्यांना त्या दुकानातील मूर्ती शाडू मातीची आहे की पीओपीची आहे, याविषयी माहिती मिळणार आहे. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते नुकतेच क्यूआर कोडचे लोकार्पण करण्यात आले.

(हेही वाचा – Maratha Reservation : आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज ही पोलिसांची दादागिरी, फडणवीसांचा यात कुठलाही हात नाही – रामदास आठवले)

मोबाईलवर तपशीलवार माहिती
गणपतीची मूर्ती विकत घेणाऱ्या ग्राहकाने दुकानावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यास त्या दुकानात असलेली मूर्ती मातीची आहे की नाही, मूर्तीकाराचे नाव इत्यादी माहिती मोबाईलवर तपासता येणार आहे. यामुळे पीओपी मूर्तींना आळा बसेल, अशी खात्री मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.

दुरुपयोग केल्यास दंड, मूर्तिकारांकडून आवाहन…
क्यूआर कोडची नक्कल किंवा दुरुपयोग केल्यास त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान 1960 मधील कलम 199,200 आणि 420 अंतर्गत तक्रार नोंदवण्यात येणार आहे. गणेशभक्तांनी क्यूआर कोड असलेल्या दुकानातून मातीची गणेशमूर्ती घ्यावी. तसेच दुकानदाराकडून पावतीवर मूर्ती मातीची असल्याचे लिहून घ्यावे, असे आवाहन पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघाद्वारे करण्यात आले आहे. त्याशिवाय, खरेदी केलेल्या मूर्तीवर मूर्तिकाराच्या नावाचा रबर स्टॅम्प लावण्यात येईल, अशी माहितीही मूर्तिकारांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.