Yuvraj Singh : युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक?

Yuvraj Singh : यापूर्वी युवराजच्या देखरेखीखाली अभिषेक शर्मासारखा खेळाडू तयार झाला आहे.

66
Yuvraj Singh : युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक?
  • ऋजुता लुकतुके

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) नावाची सध्या चर्चा आहे. स्पोर्ट्स स्टार या क्रीडाविषयक साप्ताहिकाने आपल्या वेबसाईटवर तशी बातमी दिली आहे. फ्रँचाईजीने युवराजशी संपर्क केला असून त्यांची चर्चा बरीच पुढे गेली आहे, अशी बातमी सूर्त्रांच्या हवाल्याने त्यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात रिकी पाँटिंगने हे पद सोडलं. आणि त्यानंतर लगेचच त्याने फ्रँचाईजी एका माजी भारतीय खेळाडूशी संपर्कात असल्याचे संकेत दिले होते.

(हेही वाचा – Nitesh Rane यांचे आदित्य ठाकरे यांना आव्हान; म्हणाले…)

गेल्याच महिन्यात खरंतर युवराज (Yuvraj Singh) गुजरात टायटन्सच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची बातमी पसरली होती. पण, आता तिथे आशिष नेहराच्या नावाची चर्चा आहे. कारण, तिथेही गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपद सोडलं आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने गेल्या महिन्यात दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षकपद सोडले. तो दिल्ली कॅपिटल्सशी गेले ७ हंगाम जोडला गेला होता. पण, शेवटच्या तीन हंगामात हा संघ अंतिम चार जणांमध्येही जागा मिळवू शकला नाही. त्यामुळे पाँटिंगवर संघ प्रशासन काहीसं नाराज होतं.

(हेही वाचा – World Test Championship : इंग्लंड, बांगलादेशच्या विजयामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत मोठे बदल)

युवराज सिंग (Yuvraj Singh) दिल्लीचा प्रशिक्षक ही त्याची नवीन इनिंग असेल. युवी २००८ ते २०१९ या कालावधीत आयपीएल खेळला आहे. २०१९ मध्ये त्याच्या शेवटच्या हंगामात तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. या मौसमात मुंबई इंडियन्स संघ विजयीही झाला होता. युवी त्याच्या १२ वर्षांच्या दीर्घ आयपीएल कारकिर्दीत पंजाब किंग्ज, पुणे वॉरियर्स इंडिया, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.