Yannik Sinner : उत्तेजक द्रव्य चाचणीत नापास होऊनही युएस ओपन खेळतोय यानिक सिनर; नदाल, फेडरर यावर काय म्हणाले?

63
Yannik Sinner : उत्तेजक द्रव्य चाचणीत नापास होऊनही युएस ओपन खेळतोय यानिक सिनर; नदाल, फेडरर यावर काय म्हणाले?
Yannik Sinner : उत्तेजक द्रव्य चाचणीत नापास होऊनही युएस ओपन खेळतोय यानिक सिनर; नदाल, फेडरर यावर काय म्हणाले?
  • ऋजुता लुकतुके

टेनिसमधला अव्वल खेळाडू यानिक सिनर (Yannik Sinner) गेल्या महिन्यात उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळला होता. या निकालानंतर टेनिस जगतात खळबळ उडाली होती. युएस ओपन स्पर्धा तोंडावर आली असताना हा प्रकार घडला. पण, तरीही आयोजकांनी युएस ओपन खेळण्याची परवानगी इटालीयन नंबर वन खेळाडूला दिली. मार्च महिन्यात एकदा सोडून दोनदा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतरही सिनरला खेळू दिल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता. वाडाच्या स्वतंत्र खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली होती. आणि यात ज्या ॲनाबोलिक स्टेरॉईडमुळे सिनरची चाचणी पॉझिटिव्ह आली, ते स्टेरॉईड सिनरने हेतुपुरस्सर किंवा हलगर्जीपणा करून घेतलं नसल्याचं सिद्ध झालं होतं. या निकालामुळेच सिनरला युए ओपन खेळता आलं.

पण, तरीही वाद होतच राहिला. आणि उलटसुलट चर्चाही रंगली. अशावेळी युएस ओपन स्पर्धा सुरू होऊन ८ दिवस झाले असताना टेनिसमधील दोन दिग्गज खेळाडू रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी यानिक सिनरची पाठराखण केली आहे. व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त झाल्यावर रॉजर फेडरर पहिल्यांदा युएस ओपनला आला आहे. आणि इथे पत्रकारांशी बोलताना त्याने यानिक सिनरला (Yannik Sinner) जाहीर पाठिंबा देऊ केला आहे.

(हेही वाचा – Maharashtra Rain: आता कोकणात मुसळधार! ऐन गणपतीत उडणार तारांबळ)

‘’यानिक निर्दोष आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण, या चाचण्या ज्या प्रकारे होतात आणि अनियमित निकालांचा खेळाडूंच्या मानसिकतेवर जो परिणाम होत असतो, त्याकडे या निमित्ताने मला लक्ष वेधायचं आहे. आधीच खेळाडू म्हणून शेकडो फॉर्म भरायचे असतात. रोज उत्तेजक चाचणीसाठी कुणी दारावर धडकणार नाही ना याची भीती असते. त्यातच अशा धक्क्यांना सामोरं जावं लागणं हे खेळाडूच्या आयुष्यात नकोशी असलेली गोष्ट आहे, असं फेडरर याविषयी द टेनिस लेटरशी बोलताना म्हणाला.

फेडरर बरोबरच नदालनेही आता सिनरला पाठिंबा देऊ केला आहे.

(हेही वाचा – Sanskrit Commentary : कर्नाटकमधील सामन्यात संस्कृत समालोचनाची चर्चा, आयपीएलमध्येही संस्कृतची मागणी)

नदालनेही सिनर निर्दोष असल्याची खात्री व्यक्त केली आहे. ‘माझा माणसातील चांगुलपणावर विश्वास आहे. मी सिनरला चांगला ओळकतो. तो उत्तेजक द्रव्य घेणार नाही याची मला खात्री आहे,’ असं नदाल या प्रकरणाविषयी बोलताना म्हणाला. यानिक सिनर सध्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. आणि २३ वर्षीय इटालियन खेळाडूने या हंगामात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.